बेशिस्त वाहनचालकांना रोटरी क्‍लबने दिला धडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

पुणे : शाळेत मुला-मुलीला सोडायला जाताना सर्रास वाहतुकीचे नियम मोडून जाणारे वाहनचालक आपल्याला दिसतात. पौड रस्त्यावरील करिष्मा चौकातही सोमवारी असेच चित्र होते. मात्र, जेव्हा त्यांचे छायाचित्र टिपले गेले, त्यानंतर हे 'सुजाण पालक' विनवण्या करू लागले.

'वृत्तपत्रात छायाचित्र छापून आले तर मुलांना काय सांगणार? कृपा करून आमचे छायाचित्र प्रसिद्ध करू नका, आम्ही पुन्हा नियम मोडणार नाही', अशी विनंती अनेक पालकांनी केल्याची माहिती 'रोटरी क्‍लब ऑफ पुणे पौड रस्ता'च्या सदस्यांनी दिली. 

रोटरी क्‍लब आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध चौकांमध्ये मोहीम राबविण्यात येत आहे. रोटरी क्‍लब ऑफ पुणे पौड रस्तातर्फे पौड रस्त्यावर सोमवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली.

मोहिमेत क्‍लबचे अध्यक्ष प्रदीप डांगे, प्रकल्प समन्वयक राधिका वायकर, हर्षवर्धन भुसारी, सुजाता कोतवाल, उदय कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. वारजे, कोथरूड भागातून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांची करिष्मा चौकात प्रचंड गर्दी होते.

वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असल्यामुळे वाहनचालक बिनधास्त नियमभंग करतात. पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्‍यात घालत 'झेब्रा' पट्ट्यांवर उभे राहून, लाल दिवा असतानाही चौक ओलांडण्याची घाई करणारे वाहनचालक या चौकात दिसून आले. 'यू-टर्न' घेणाऱ्या वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यात अडचणी येतात. 

Web Title: Rotary Club Pune working for undisciplined traffic