उच्छाद मांडलेल्या माकडास महिला वनरक्षकाने शिताफीने केले जेरबंद 

दत्ता म्हसकर 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कांचन ढोमसे या महिला वनरक्षक पिंजऱ्यासह येथे आल्या. यावेळी माकडाने त्यांना पकडले असता त्यांनी न डगमगता मोठ्या हिंमतीने स्वतः हळूच पिंजऱ्यात प्रवेश केला. 

जुन्नर - हिवरे खुर्द ता. जुन्नर येथे गेल्या आठ दिवसापासून उच्छाद मांडलेल्या माकडाला महिला वररक्षक कांचन ढोमसे यांनी मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद केले. एकट्या महिला वनरक्षकाने जीवाची पर्वा न करता ही कामगिरी केली.

गावातील लहान मुलांना, महिलांना या माकडाने जखमी केल्याच्या घटना घडल्या होत्या. वयस्कर पुरुष व महिलांना त्याने लक्ष केले होते. त्यामुळे यास पकडण्याची मागणी करण्यात आली होती.

कांचन ढोमसे या महिला वनरक्षक पिंजऱ्यासह येथे आल्या. यावेळी माकडाने त्यांना पकडले असता त्यांनी न डगमगता मोठ्या हिंमतीने स्वतः हळूच पिंजऱ्यात प्रवेश केला. यावेळी त्यांना पकडून असलेले माकड देखील पिंजऱ्यात आले. कोणाचीही मदत न घेता महिला वनरक्षक कांचन ढोमसे यांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. 

Junnar


आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Rowdy Monkey Has Caught In By Women Forest Guard Junnar