पुणे ‘इंटरसेप्टर्स’ची रस्त्यांवर स्वारी

पुणे ‘इंटरसेप्टर्स’ची रस्त्यांवर स्वारी

पुणे - ‘रॉयल एनफिल्ड’ने सादर केलेल्या ‘इंटरसेप्टर ६५०’ या दुचाकीला महिनाभरातच इंडियन मोटारसायकल ऑफ दी इअर २०१९ (आयएमओटीवाय) हा पुरस्कार मिळाला. यानिमित्त पुण्यातील शंभरहून अधिक ‘इंटरसेप्टर ६५०’चे मालक रविवारी एकत्र आले आणि लोणावळ्यापर्यंत प्रवास करीत त्यांनी या दुचाकीने जिंकलेल्या पुरस्काराचा आनंद साजरा केला. 

रॉयल एनफिल्डच्या मार्केटिंग विभागाचे जागतिक प्रमुख शुभरांशू सिंग यांनी इंटरसेप्टरच्या ताफ्याला सकाळी ७ वाजता कोरेगाव पार्क येथे हिरवा झेंडा दाखवीत या राइडला प्रारंभ केला. लोणावळ्यामध्ये पोचल्यानंतर या रायडर्सचे दोन सुंदर कस्टम  दुचाकींद्वारे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

रॉयल एनफिल्डने ‘इंटरसेप्टर ६५०’ ही मिड सेगमेंटमधील (२५०-७५० सीसी) दुहेरी सिलिंडरची नवी दुचाकी नोव्हेंबर २०१८ मध्ये सादर केली होती. महिनाभरातच (डिसेंबर) तिला ‘आयएमओटीवाय’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार भारतातील दुचाकी उत्पादनांसाठी सर्वांत महत्त्वाचा व मानाचा समजला जातो. भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह प्रकाशनांचे प्रतिनिधित्व करणारे संपादक व पत्रकारांच्या मंडळाकडून २००७ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. त्यासाठीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असून, ज्युरी राउंडमध्ये किंमत, इंधनक्षमता, स्टायलिंग, आरामदायीपणा, सुरक्षितता, परफॉर्मन्स, तांत्रिक नावीन्यता आणि रायडिंग परिस्थितीसाठीची योग्यता अशा निकषांवर विजेत्यांची निवड केली जाते. २०१९ साठी देशांतर्गत व जागतिक कंपन्यांच्या दुचाकींच्या तुलनेत ‘इंटरसेप्टर ६५०’ सर्वोत्कृष्ट ठरली. रॉयल एनफिल्ड आपल्या क्‍लासिक थीमवर आधारित रूप, किमान डिझाइन, इंजिनाचा अतुलनीय ‘थंप’ आणि ती चालविणाऱ्यांमधील सहजता व धाडसी वेगळेपणा, अशा वैशिष्ट्यांमुळे इतरांहून वेगळी ठरते. नोव्हेंबर २०१८ मध्ये जगभरात सादर झालेली ‘इंटरसेप्टर आयएनटी ६५०’ पुण्यात २,५०,००० मध्ये (एक्‍स-शोरूम) उपलब्ध आहे. या दुचाकीसोबत ३ वर्षांची वॉरंटी आणि रोडसाइड असिस्टंट्स सेवाही उपलब्ध आहे.

पुणे ही निर्णायक बाजारपेठ
एकाचवेळी १०० हून अधिक इंटरसेप्टर बघणे हा सुखद अनुभव आहे. ‘इंटरसेप्टर ६५०’ला हा पुरस्कार मिळाल्यामुळे ग्राहकांनी या दुचाकीला दिलेला प्रतिसाद व तिच्यावर दाखविलेला विश्‍वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्र ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ असून, त्यातही पुणे ही निर्णायक स्वरूपाची बाजारपेठ  आहे. इंटरसेप्टर रायडर्सचा समुदाय स्थिरपणे वाढत असून, या भागात मध्यम आकाराच्या दुचाकी लवकर स्वीकारल्या जात आहेत. या शहराने आम्ही देत असलेल्या मोटारसायकलिंग अनुभवाप्रति कायम प्रेम व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात आम्ही ६५० हून अधिक ट्‌विन्स विकल्या असून, ही नोंद उत्साहवर्धक असल्याचे रॉयल एनफिल्डच्या मार्केटिंग विभागाचे जागतिक प्रमुख शुभरांशू सिंग यांनी सांगितले. 

‘इंटरसेप्टर आयएनटी ६५०’ची खासियत
इंटरसेप्टर आयएनटी ६५० ही उच्च क्षमतेची ‘रोडस्टर’ दुचाकी आहे. १९६० च्या दशकात अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या इंटरसेप्टरची प्रेरणा या दुचाकीमागे असून, मूळ इंटरसेप्टरप्रमाणे नवी दुचाकी बहुआयामी व शहरासह महामार्गासाठी उत्तम आहे. आरामदायी व भक्कम रायडिंग पोझिशन, जोमदार हाताळणी, आकर्षक टॉर्क इंजिन ही तिची वैशिष्ट्ये असून, यामुळे तिची राइड आनंददायी अनुभव देते. समुद्रकिनाऱ्यावरील रस्ते असो की जंगल परिसर, ही दुचाकी सर्वार्थाने सुयोग्य ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com