उपमहापौरपदासाठी आरपीआय आक्रमक 

rpi
rpi

पुणे -महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर उपमहापौरपद पहिली अडीच वर्षे "आरपीआय'ला देण्यात आले. मात्र, आता याही पदासाठी भाजपने आपला उमेदवार दिल्याने "आरपीआय'च्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमहापौरपदाची मागणी लावून धरली. तेवढेच नाही तर डावलल्यास वेगळी भूमिका घेण्याचा इशारा देत आरपीआयच्या नेत्यांनी भाजपच्या बैठकीतून काढता पाय घेतला. 

या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, खासदार संजय काकडे आणि गणेश बिडकर यांनी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा मिसाळ आणि परशुराम वाडेकर यांच्यात मतभेद झाल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर पुढील वर्षी आरपीआयला उपमहापौरपद देऊ, असा शब्द भाजपने दिला. 

उपमहापौरपद आम्हाला मिळायला हवे. परंतु, सध्या ते भाजपने घेतल्याने आम्ही विरोध केला. मात्र, पुढील वर्षी हे पद आम्हाला देण्याचा शब्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. भाजप नेते शब्द पाळतील आणि पुन्हा आरपीआयचा उपमहापौर होईल. त्यामुळे भाजपसोबत आहोत. 
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com