"रिपब्लिकन'च्या उमेदवार लांडगे "कमळ' चिन्हावर लढणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) उमेदवार सोनाली लांडगे यांच्या चिन्हाचा प्रश्‍न मिटल्यामुळे त्यांना आता "कमळ' चिन्हावर निवडणूक लढविता येणार आहे. तर सत्यभामा हनुमंत साठे यांचाच "एबी फॉर्म' ग्राह्य धरला जावा, यासाठी रिपब्लिकनचे पदाधिकारी पुन्हा एकदा भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत. 

रिपब्लिकनच्या लांडगे या पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या (प्रभाग 7 अ ) प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. मात्र भाजप-रिपब्लिकन युती असतानाही भाजपने दुसऱ्या एका उमेदवारालाही पक्षाचा अधिकृत अर्ज देऊन गोंधळ निर्माण केला होता. यातील तांत्रिक त्रुटी दूर करून रविवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लांडगे यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढता येईल, असे जाहीर केले. याच पद्धतीने नवी पेठ- पर्वतीमधून (प्रभाग 29) रिपब्लिकनच्या सत्यभामा साठे यांना "एबी फार्म' देण्यात आला होता. इथेही भाजपने माजी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना "एबी फार्म' देऊन प्रक्रिया अधिक किचकट केली होती. या विषयी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमोर हा प्रश्‍न मांडला. 

कांबळे म्हणाले, ""प्रभाग 29 ची जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या तडजोडीतून सुटली होती. बापट यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही भेट घेऊन शेंडगे यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rpi & bjp in pmc