Vidhan Sabha 2019 :  पुणे कॅंटोन्मेंटच्या जागेवरून आरपीआयचा नाराजीचा सूर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

शिवसेनेबरोबरच आता रिपब्लिकन पक्षानेही (आठवले गट) भाजपच्या विरोधात नाराजीचा सूर आळवण्यास सुरवात केली आहे. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघाची जागा पक्षाला मिळावी, अशी मागणी करूनही भाजपने ठेंगा दाखविला, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने भाजप उमेदवारांचा प्रचार करायचाच नाही, असा निर्णय घेतला आहे. 

विधानसभा 2019 
पुणे - शिवसेनेबरोबरच आता रिपब्लिकन पक्षानेही (आठवले गट) भाजपच्या विरोधात नाराजीचा सूर आळवण्यास सुरवात केली आहे. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघाची जागा पक्षाला मिळावी, अशी मागणी करूनही भाजपने ठेंगा दाखविला, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने भाजप उमेदवारांचा प्रचार करायचाच नाही, असा निर्णय घेतला आहे. 

पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. एकही जागा न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कॅंटोन्मेंटची जागा मिळावी, यासाठी पक्षाने खूप प्रयत्न केले. मात्र, भाजपने "आरपीआय'ला गृहीत धरून एकही जागा सोडली नाही. भाजपने रिपब्लिकन पक्षाला न्याय दिला नाही.  त्यामुळेच आठही मतदारसंघांत भाजपला प्रचारात सहकार्य करायचे नाही, अशी भूमिका बैठकीत एकमताने घेण्यात आली. 

पक्षाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, बाबूराव घाडगे, शैलेंद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI disgruntled for Pune Cantonment Constituency