पुण्यात रिपब्लिकन पक्षात फूट

पुण्यात रिपब्लिकन पक्षात फूट

पुणे -  महामंडळाच्या नियुक्‍त्या आणि भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे रिपब्लिकन पक्षात (आठवले गट) पडलेल्या दोन गटांतील संघर्ष पेटू लागला आहे. माजी शहराध्यक्ष आणि पश्‍चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेंद्र कांबळे यांची हकालपट्टी करण्याचा ठराव शहर रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत करण्यात आला.

गेल्या आठवड्यात पक्षाचे नेते रामदास आठवले यांना भाजपकडून हीन वागणूक दिली जात असल्याचे कारण पुढे करीत मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्यासह काही जणांनी पक्षाचे राजीनामे दिले होते, त्यामुळे रिपब्लिकन पक्षात फूट पडली होती. दरम्यान, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठराव या वेळी मंजूर करण्यात आल्याचे सरचिटणीस महिपाल वाघमारे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

कार्यकारिणी बरखास्त करा - कांबळे
मला पदावरून काढण्याचा अधिकार फक्त पक्षाचे नेते रामदास आठवले यांनाच असल्याचे महेंद्र कांबळे यांनी याबाबत बोलताना सांगितले. पुणे शहराची निष्क्रिय कार्यकारिणी त्वरित बरखास्त करण्याची मागणी आठवले यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काही नेत्यांना अडचण येऊ नये म्हणून पक्षामध्ये काहीजण दलाली करीत आहेत. त्यांच्याविरोधात माझा संघर्ष असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com