विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाजवणार बारा : आठवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

मांजरी येथील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले गुरुवार (ता.12) रात्री उशिरा येथे आले होते.

मांजरी : सरकारी जागेवरील घरांना नुसता आठ-अ नाही, तर लवकरच सात-बारा ही उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी नागरिकांना सर्वप्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले.

- Vidhansabha 2019 : प्रकाश आंबेडकरांचं ठरलं! 'वंचित' लढवणार 288 जागा

मांजरी येथील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले गुरुवार (ता.12) रात्री उशिरा येथे आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मांजरी ग्रामपंचायतचे सरपंच शिवराज घुले, डॉ. विजय मोरे, असित गांगुर्डे, परशुराम वाडेकर, युवकचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उपाध्यक्ष गजेंद्र मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

- विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत मनसेचे ठरता ठरेना!

रात्री बारा वाजले असले तरी महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी त्यांनी कविता सादर केली, "जरी कार्यक्रमाला वाजले असतील बारा, तरी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाजवणार बारा,' या त्यांच्या काव्याने उपस्थितांमध्ये हशा पसरला.

यावेळी युवा कार्यकर्ता गजेंद्र मोरे यांचा मांजरी ग्रामस्थांच्या वतीने रामदासजी आठवले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सम्मान करण्यात आला.

- भाजपचा 'महाजनादेश' उद्या पुण्यात; वाहतूक व्यवस्था काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI leader Ramdas Athawale comment about Assembly election