इंदापूर तालुक्यासाठी हिवाळी अधिवेशामध्ये ३६ कोटी रुपये मंजूर

राजकुमार थोरात 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व  न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये  सन २०१८-१९च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. जिल्हामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचे आमदार असतानाही  सर्वार्धिक निधी खेचून आणण्यामध्ये भरणे यांना यश आले आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील ९ रस्त्यांच्या कामासाठी व  न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये  सन २०१८-१९च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ३५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली. जिल्हामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचे आमदार असतानाही  सर्वार्धिक निधी खेचून आणण्यामध्ये भरणे यांना यश आले आहे.

गेल्या दोन दिवसापासुन मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशानास सुरवात झाली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१८-१९चे पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये इंदापूर तालुक्यासाठी आमदार भरणे यांच्या प्रयत्नामुळे ३५ कोटी ९६ लाख रुपये भरगच्छ निधी मंजूर झाला. पुणे जिल्हामध्ये सर्वाधिक निधी इंदापूर तालुक्याला मिळाला आहे. यामध्ये तालुक्यातील ९ रस्त्याचे कामे मार्गी लागणार असून दळणवळण सोईचे होणार आहे. तालुक्याचा विकास होण्यासाठी या निधीची मोलाची मदत होणार आहे. आमदार भरणे यांनी गेल्या चार वर्षामध्ये रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. ३५ कोटी ९६ लाखामध्ये इंदापूर शहरातील न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी १४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रस्त्याच्या कामासाठी २१ कोटी ९६ लाख रुपये मंजूर झाले असून यामध्ये पिंपरी-गिरवी-आडोबा वस्तीच्या या साडेसहा कि.मी लांबीच्या रस्त्यासाठी नॉन प्लॅन अंतर्गत ४ कोटी ५५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.  

रामवाडी-निमगाव-केतकी-लाखेवाडी रस्त्याचे नाबार्ड अंतर्गत करण्यात येणार असून, या कामासाठी ३ कोटी ३८ लाख रुपये, सार्वजनिक बांधका विभागाच्या माध्यमातुन वालचंदनगर-अंथुर्णे-शेळगाव-व्याहाळी-कौठळी रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी, निमगाव केतकी-रामकुंड-शेटफळ हवेली रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ५० लाख रुपये, राजेवाडी-पोंदकुलवाडी-निमगाव केतकी- लाखेवाडी, व वालचंदनगर-रणगाव-शिरसटवाडी-भोडणी या दोन रस्त्यासाठी कामासाठी प्रत्येकी २ कोटी रुपये, कळंब-लासुर्णे, वालचंदनगर-सराफवाडी-रेडा-वकीलवस्ती व लोणी-वरकुटे- कळाशी-गंगावळण या तिन्ही रस्त्याच्या कामासाठी प्रत्येकी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे भरणे यांनी सांगितले.

Web Title: Rs. 36 crores approved for Indapur taluka in winter session