इंदापूर तालुक्यासाठी सव्वा वर्षामध्ये ५८ कोटी रुपयांचा निधी आणला - प्रवीण माने

राजकुमार थोरात
मंगळवार, 19 जून 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सव्वा वर्षामध्ये ५८ कोटी रुपयांचा विकासनिधी आणला आहे. भविष्यात ही तालुक्यासाठी जास्तीजास्त निधी उपलब्ध करुन देणार असल्याचा विश्‍वास पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती  प्रवीण माने यांनी दिली.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सव्वा वर्षामध्ये ५८ कोटी रुपयांचा विकासनिधी आणला आहे. भविष्यात ही तालुक्यासाठी जास्तीजास्त निधी उपलब्ध करुन देणार असल्याचा विश्‍वास पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती  प्रवीण माने यांनी दिली.

इंदापूर मध्ये प्रवीण माने यांच्या वाढदिवासानिमित्त  आयोजित केलेल्या सत्कारसमारंभाच्या कार्यक्रमामध्ये सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे,दौंड आमदार राहुल कुल, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,सोनाई उद्योग समुहाचे अध्यक्ष दशरथ माने, झेडपीचे माजी सभापती मंगलदास बांदल,भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुदर्शन चौधरी,माढ्याचे धनराज शिंदे, पंढरपूरचे परिचारक  उपस्थित होते. यावेळी माने यांनी सांगितले की, सव्वा वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन विविध विकास कामे करण्यात आली. सव्वा वर्षामध्ये सुमारे ५८ कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणला आहे.आगामी काळामध्ये जास्तीजास्त निधी आणण्यासाठी  प्रत्नशिल राहणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, पुणे झेडपीचे सभापती प्रवीण माने यांचा सामाजिक कामामध्ये मोठा सहभाग असतो.त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक कामे मार्गी लागली असल्याचे सांगितले. यावेळी प्रवीण माने यांनी सव्वा वर्षामध्ये केलेल्या विकासकामांची पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

आदर्श शिंदे यांच्या गायनाने नागरिक झाले मंत्रमुग्ध...
इंदापूरमध्ये माने यांच्या वाढदिवसाचे औच्युत साधून प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गायनाच्या कार्य्रकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांनी तु सुखकर्ता...तु दुखहर्ता...., पार्वतीच्या बाळा... तुझ्या पायात वाळा..., येळकोट येळकोट जय मल्हार....खंडोबाच्या नावाने चांगभलं....,देवा तुझ्या गाभाऱ्याला....ही गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Web Title: Rs 58 crores fund for Indapur taluka in the year - Pravin Mane