जिल्ह्याला ६६ कोटी रुपयांचा निधी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

शेटफळगढे- चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना जनरल बेसिक ग्रॅटचे प्रतिवर्षी वितरण करण्यात येते. यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील अनुदानाचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ६६ कोटी १३ लाख ७९ हजारांच्या अनुदानाचा निधी प्राप्त झाला आहे.

 यानुसार सरकारने १६ जुलै २०१५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्याला प्राप्त झालेल्या या अनुदानाचे ग्रामपंचायतीची लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषांच्या आधारे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना लवकरच वितरण केले जाणार आहे. याबाबतच्या अनुदान वितरणाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. गावातील सध्याच्या परिस्थितीचे विश्‍लेषण करून 

गावच्या विकासकामाच्या गरजांच्या प्राधान्यानुसार ग्रामसभेच्या मान्यतेने या वित्त आयोगातील अनुदानाचा निधी खर्च करावा, अशा सूचना सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी २७ जूनच्या सरकारी निर्णयाच्या आधारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.   

पायाभूत सुविधांसाठी ९० टक्के निधी 
चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला लोकसंख्या व क्षेत्रफळ 
या आधारे प्राप्त होणाऱ्या अनुदानातून ग्रामपंचायत विकास आराखड्यातील कामे करावी लागणार आहेत. मात्र ही कामे करताना ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या अनुदानापैकी ९० टक्के निधी हा सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या कामासाठी, तर १० टक्के निधी हा प्रशासकीय व तांत्रिक बाबीसाठी खर्च करावा, अशाही सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. 

Web Title: Rs 66 crores fund for the district