अनोळखी कंपनीच्या नावे ट्रान्सफर झाले 80 लाख, पण पुढे काय झाले?

अनोळखी कंपनीच्या नावे ट्रान्सफर झाले 80 लाख, पण पुढे काय झाले?

पुणे : ठेकेदाराच्या खात्यातून परस्पर ट्रान्सफर झालेली तब्बल 80 लाखांची रक्कम वेळीच खाते गोठविल्याने 24 तासांच्या आत खात्यावर पुन्हा जमा झाली. सायबर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे ही रक्कम तक्रारदारांना परत मिळाली आहे.

याबाबत एका सरकारी ठेकेदाराने 7 डिसेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास सायबर पोलिस स्टेशन गाठले होते. तक्रारदार यांची कंपनी आहे. त्या कंपनीच्या खात्यातून 6 डिसेंबर रोजी साडेचारच्या सुमारास पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत तक्रार केली होती. पोलिसांनी तक्रारीचे स्वरूप जाणून घेऊन फसवणूक झालेली रक्कम कोणत्या बॅंकेत ट्रान्सफर झाले, याचा शोध घेण्यास सुरवात केली. ही रक्कम राजस्थान, जयपूर येथील देना बॅंकेचे ग्लोब इंपेक्‍स ट्रेडर्स या खात्यावर जमा झाल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी त्वरित हालचाली करून संबंधित बँकेला ई-मेल पाठवून रक्कम गोठविण्यास सांगितले. तसेच ती रक्कम अर्जदारांचा खात्यावर पुन्हा पाठविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्याच दिवशी ती रक्कम अर्जदाराच्या खात्यावर जमा झाली. अर्जदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस पुढील तपास करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com