आता रासपचाही स्वबळाचा नारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने योग्य जागा न दिल्यास राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असे रासपचे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, महिला अध्यक्षा शीतल चव्हाण, युवक अध्यक्ष उमेश कोकरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. 

रासपच्या कार्यामुळे जनतेमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. रासपच्या माध्यमातून अनेक समस्या सोडविण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण, सिंहगड रस्त्यावरील गरजूंना धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळण्यासाठी पक्षाने काम केले आहे, असेही प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 
 
Web Title: rsp boast to fight alone