भागवतांनी नेमके काय घातले दगडुशेठला साकडे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (आरएसएस) मोहन भागवत यांनी मंगळवारी दगडूशेठचे दर्शन घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भागवत यांनी नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दर्शन घेऊन नेमके काय साकडे घातले असावे? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तत्पूर्वी अभिषेकादरम्यान मात्र, राम मंदिर उभारण्याबाबत साकडे घालावे, अशी अपेक्षा मंदिरातील गुरुजींनी भागवत यांच्याकडे केली. दगडूशेठच्या दर्शनाला यायचे ठरवले होते; तो योग आज असल्याचे भागवत यांनी सांगितले. 

एका कार्यक्रमानिमित्त भागवत मंगळवारी पुण्यात होते. त्याआधी सकाळी दहा वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपतीची आरती केली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, नगरसेवक हेमंत रासणे, "आरएसएस'चे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, उल्हास भट, महेश सूर्यवंशी, सुनील रासणे, राजेंद्र घोडके यांच्यासह "आरएसएस' आणि ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. 
mohan bhagwat
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भागवत गणरायाला नेमके काय मागणार? याबाबत उत्सुकता होती. मात्र, दर्शनानंतर माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यास त्यांनी नकार दिला. परंतु, गेली अनेक वर्षे दर्शनाला यायचे होते. तो योग आला नव्हता, मात्र तो आज आल्याचे सांगून भागवत पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. दरम्यान, दगडूशेठ मंदिराच्या परिसरात सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: RSS chief Mohan Bhagwat took a glimpse of Dagdashesheth in pune