"आरटीई' प्रवेशासाठी 16 मदत केंद्रे 

"आरटीई' प्रवेशासाठी 16 मदत केंद्रे 

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि वंचित गटातील राखीव जागांवरील प्रवेशासाठी अर्ज भरताना पालकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, म्हणून पुणे महापालिकेने शहरात 16 मदत केंद्रे सुरू केली आहेत. यातील 14 केंद्रे ही दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 फेब्रुवारीपर्यंत राहील. 

विभाग मदत केंद्राचा पत्ता 
- विश्रामबागवाडा धर्मवीर संभाजी महाराज मनपा शाळा क्र. 17, शास्त्री रस्ता, नवी पेठ. 
- वारजे/कर्वेनगर पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा क्र. 74, पौडफाटा, कर्वेनगर. 
- टिळक/सिंहगड रस्ता चंद्रकांत दांगट पाटील शाळा, सिंहगड रस्ता, वडगाव बुद्रुक. 
- औंध स्वामी विवेकानंद शाळा क्र. 66, विद्यापीठ गेट, गणेशखिंड. 
- कोंढवा/वानवडी वासुदेव बळवंत फडके क्र. 69, भैरोबानाला, वानवडी. 
- कात्रज/सहकारनगर शिवाजी माध्यमिक स्कूल, टेल्को कॉलनी, दत्तनगर, पुणे 
- बिबवेवाडी हुतात्मा बाबू गेनू शाळा क्र. 39, बिबवेवाडी 
- घोले रस्ता द आंध्रा स्कूल, डेक्कन. 
- नगररस्ता हंबीरराव मोझे शाळा क्र. 58, चंदननगर. 
- हडपसर साधना स्कूल, माळवाडी, हडपसर. 
- विश्रांतवाडी विठ्ठलराव गाडगीळ शाळा क्र. 84, विश्रांतवाडी. 
- भवानी पेठ शांताबाई लडकत शाळा क्र. 9 नाना पेठ. 
- ढोले पाटील रस्ता शाहू महाराज मनपा शाळा क्र. 53, मुंढवा. 
- कोथरूड छत्रपती संभाजी विद्यालय क्र. 70, शिवाजी पुतळ्यासमोर. 

- घोले रस्ता (दुपारी 12 ते 4) : नेहरू सांस्कृतिक भवन, दुसरा मजला, प्रबोधिनी हॉल. 
- हडपसर (दुपारी 12 ते 4) : एनआयआयटी फाउंडेशन, सिद्धिविनायक पार्क, मेगा सेंटरसमोर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com