आरटीई प्रवेशाची "एन्ट्री लेव्हल' बदलली

RTE
RTE

पिंपरी - शहरातील बहुतांश खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश मर्यादा (एन्ट्री लेव्हल) नर्सरीऐवजी इयत्ता पहिली अशी बदलली आहे. त्यामुळे वयाची तीन वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना शिक्षण हक्क प्रवेश पद्धतीने शाळेत नाव दाखल करणे अवघड झाले आहे. या बदलाबाबत पालक अनभिज्ञ असल्याने त्यांच्या पाल्यांना प्रवेशाबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

आरटीईचा हा कोटा पूर्वप्राथमिक म्हणजेच नर्सरी प्रवेशासाठी लागू नाही, असा मुद्दा उपस्थित करीत या कोट्याअंतर्गत प्रवेश देणाऱ्या 80 टक्के शाळांनी प्रवेश मर्यादा बदलली. ज्या शाळांनी पाच वर्षांपूर्वी "नर्सरी एन्ट्री लेव्हल' ठेवली होती, आता त्या शाळांची नावे ऑनलाइन दिसत नाहीत. त्यामुळे या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना नर्सरीत प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत.

पालक आरटीई प्रवेशासाठी सरकारी मदत केंद्राऐवजी सायबर कॅफेवर अर्ज करीत आहेत. "तुमचा अर्ज चुकला असला किंवा तुम्हाला पसंतीची शाळा दिसत नसल्यास अर्ज डिलीट करा,' अशी माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर दिसते. मात्र, कॅफेचालकांकडून याची माहिती दिली जात नसल्याने पालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

जन्मतारखेनुसार प्रवेश नोंदणी केली जाते. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढील वेळी अर्जाचा क्रमांक लक्षात न राहिल्यास, संकेतस्थळावर आरटीई प्रवेशासाठी अर्ज स्वीकारत जात नाही. त्यामुळे पालकांनी जवळच्या मदत केंद्रावर संपर्क साधून त्यांचे अर्ज करण्याची आवश्‍यकता आहे. या वर्षी 176 शाळांनी ऑनलाइनसाठी नोंदणी केली आहे, वयाची अट पूर्ण करणाऱ्या मुलांचेच प्रवेश अर्ज स्वीकारले जात आहेत.

खासगी शाळांमधील नर्सरी प्रवेशावर कुणाचेच बंधन नाही. त्यामुळे बहुतांश शाळांनी एन्ट्री लेव्हल बदलली आहे. पालकांकडून डोनेशनची मागणी या प्रवेशावेळीच केली जाते. त्यामुळे पालकांनी आरटीईअंतर्गत पहिलीला प्रवेश घ्यावा. त्यामुळे पसंतीच्या शाळा मिळण्यास अडचण येणार नाही.
- राहुल कोल्हटकर, आरटीई मदत केंद्रचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com