'आरटीई'तील राखीव प्रवेशासाठी मुदतवाढ

RTE
RTE

ऑनलाईन अर्ज आता 30 मार्चपर्यंत; दोन लाख 15 हजार अर्ज प्राप्त
पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवर प्रवेशाअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील जवळपास एक लाख 16 हजार 757 राखीव जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (2009) नुसार 2019-20 शैक्षणिक वर्षातील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ही मुदतवाढ आहे. राज्यातील नऊ हजार 194 शाळांमधील राखीव जागांसाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख 15 हजार 440 ऑनलाइन अर्ज आले आहेत. शिक्षण विभागातर्फे यंदा पहिल्यांदाच स्वतंत्र मोबाईल ऍपद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत जवळपास सातशेहून अधिक अर्ज मोबाईल ऍपद्वारे करण्यात आले आहेत.

आरक्षणानुसार आकडेवारी
जिल्हा : आरक्षण लागू असलेल्या शाळांची संख्या : राखीव जागा : आलेले अर्ज

पुणे : 963 : 16,594 : 48,420
नागपूर : 675 : 7,204 : 24,162
नाशिक : 457 : 5,735 : 12,790
सोलापूर : 344 : 3,097 : 4,399
ठाणे : 652 : 13,400 : 14,308
एकूण (राज्यातील सर्व जिल्हे मिळून) : 9,194 : 1,16,757 : 2,15,440

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com