शाळांना विद्यार्थ्यामागे मिळणार सतरा हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांनी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्यासाठी राज्य सरकारने प्रतिविद्यार्थी १७ हजार ६७० रुपये रक्कम निश्‍चित केली आहे. त्याचे प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून वेळापत्रक जाहीर करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांनी २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्यासाठी राज्य सरकारने प्रतिविद्यार्थी १७ हजार ६७० रुपये रक्कम निश्‍चित केली आहे. त्याचे प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून वेळापत्रक जाहीर करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेश दिले जातात; परंतु प्रतिविद्यार्थी शुल्क परतावा शाळांना मिळत नाही. या प्रवेशाची 

ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक शाळांना हा परतावा मिळालेला नाही. ज्या वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, त्याच वर्षी शुल्काची रक्कम मिळावी, अशी शाळांची मागणी असते. त्याची दखल  शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE School Student 17000 Rupees Return