वाहन परवान्यासाठी आता नवी वेबसाईट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 'सारथी 4.0' संगणकप्रणाली सुरू केल्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी www.sarathi.nic.in याऐवजी www.paraivahan.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. लवकरच ही प्रणाली ई-सेवा केंद्रातही उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 'सारथी 4.0' संगणकप्रणाली सुरू केल्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी www.sarathi.nic.in याऐवजी www.paraivahan.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. लवकरच ही प्रणाली ई-सेवा केंद्रातही उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 'वाहन 4.0' या प्रणालीनंतर आता 'सारथी 4.0' ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दहा एप्रिलपासून ही प्रणाली वापरात आणली असून, परवाना काढण्याच्या ऑनलाइन प्रक्रियेत काही बदल झाले आहेत. यापूर्वी 'सारथी' वेबसाइटवरून परवान्याकरिता अपॉइंटमेंट घेतली जात होती. 'सारथी' वेबसाइटद्वारे अपॉइंटमेंट घेताना कागदपत्रांची केवळ माहिती द्यावी लागत होती. आता नवीन प्रणालीमध्ये ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठीची वेबसाइट बदलण्यात आली आहे. 

नागरिक 'परिवहन'च्या वेबसाइटवरून अपॉइंटमेंटसाठी अर्ज करू शकतात. ही वेबसाइट सुरू केल्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेस, त्यानंतर सारथी सर्व्हिसचा पर्याय निवडून ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडावा लागणार आहे. लायसन्सच्या प्रकारानुसार पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पार पाडावी लागेल. यामध्ये अर्ज भरून झाल्यानंतर आवश्‍यक कागदपत्रेही ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहेत. 

लर्निंग लायसन्ससाठीचे शुल्कही लवकरच ऑनलाइन भरता येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत 'ई सेवा केंद्रांत'ही वाहन परवान्यासाठीचे अर्ज भरता येणार असून, येथे 'सारथी 4.0' ही प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करावी लागणार असल्याने तो पुरावा म्हणून आरटीओकडे राहील. 
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

Web Title: RTO introduces new website for Driving licence application