'आरटीओ'ने बसवली समाधानाची घंटा

RTO introduces satisfactory bell for a feedback
RTO introduces satisfactory bell for a feedback

वडगाव निंबाळकर - बारामती उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात आलेल्या नागरीकाचे मत जाणुन घेण्यासाठी प्रवेश द्वाराजवळ समाधान घंटा लावली आहे. कार्यालयातील कामाबद्दल समाधानी असाल तर एकदा घंटा वाजवुन प्रतिसाद द्यायचा असमाधानी असाल तर आपली तक्रार नोंद वहित नोंदवायची.

नागरीकांच्या समस्या जानुन घेत सोयी देण्याचा प्रयत्न बारामती उपप्रादेशिक कार्यालयात नेहमी चालु असतो. नागरीकांना चांगली सेवा देत वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी विविध उपक्रमही राबवले जातात. कार्यालयाच्या वैभवात भर पडावी यासाठी नेहमी आग्रेसर असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांच्या संकल्पने नुसार आता कार्यालयात कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने समाधान घंटा लावण्यात आली आहे. याबाबतची माहिती नागरीकांना व्हावी यासाठी खाली एक फलकावर मजकुर लिहला आहे.      

विविध कामांसाठी येणाऱ्या नागरीकांचे स्वागत, आमच्या कामबद्दल आपणास आमच्याकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल आपण समाधानी असाल तर हि घंटा वाजवून आम्हाला दाद द्या, जेणेकरून आपली आणखी चांगली सेवा करण्याची आम्हाला उर्जा मिळेल. असमाधानी असाल तर आपली सुचना तक्रार पेटीत टाका किंवा अस्थापना शाखेतील तक्रार नोंदवहीत आपली तक्रार नोंदवा किंवा सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटा. आपली सेवा करण्याची संधी दिल्या बद्दल धन्यवाद. असा आशय असलेला मजकुर कार्यालयात येणाऱ्यांचे लक्ष वेधुन घेत आहे.

बारामती कार्यालयात आलेल्या बहुतांशी नागरीकांची कामे होत असतात पण याची प्रतिक्रीया व्यक्त करण्याची सोय नव्हती फक्त तक्रारी मिळत होत्या चांगल्या कामाची दाद मिळाल्यास कामाचा उत्साह वाढतो यासाठी हा प्रयत्न आहे. - सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रेय सांगोलकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com