आरटीओकडून मिळेना फिटनेस सर्टिफिकेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

पिंपरी - नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. यासाठी परिवहन विभागाने वाहनांना दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मात्र, चिखली आरटीओ कार्यालयात पासिंग झाल्यावरही ‘फिटनेस सर्टिफिकेट’ मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

पिंपरी - नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. यासाठी परिवहन विभागाने वाहनांना दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मात्र, चिखली आरटीओ कार्यालयात पासिंग झाल्यावरही ‘फिटनेस सर्टिफिकेट’ मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

चिखली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित पिंपरी-चिंचवड शहरासह लोणावळा, जुन्नर, आळेफाटा, खेड, मावळ आदी परिसर येतो. या परिसरामधून हजारो नागरिक कामानिमित्त आरटीओ कार्यालयामध्ये येतात. तीनचाकी, चारचाकी तसेच टेंपो, ट्रकसारख्या अवजड वाहनांची दरवर्षी तपासणी करून पासिंग करणे आवश्‍यक असते. पासिंग झाल्यावर त्वरित सही-शिक्का मारून फिटनेस सर्टिफिकेट देणे आवश्‍यक आहे; परंतु चिखली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सकाळी आणि सायंकाळी अशा वेळेत प्रत्येकी दोन असे चार निरीक्षक ‘ड्यूटी’ करतात. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक निरीक्षकाने एकेक प्रतिनिधी ठेवलेला आहे. निरीक्षक केवळ संगणकावर थम्ब करतात आणि निघून जातात. त्यानंतर त्यांची सगळी कामे हे प्रतिनिधी करतात. त्यामुळे एका दिवसात होणाऱ्या कामाला आता आठवडा लागत आहे. नागरिकांची कामे खोळंबली आहेत. हेच काम पूर्वी क्‍लार्क करत असत. आता यासाठी निरीक्षक आहेत. याविषयी आरटीओ कार्यालयात चौकशी केली असता, प्रिंटर खराब असल्याचे सांगण्यात येते. तपासणीमध्ये फिटनेस सर्टिफिकेट नसल्यास वाहतूक पोलिस दंड आकारतात. त्याचा वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे. पासिंग करूनही आरटीओच्या या नियोजनशून्य कारभारामुळे मात्र नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा 
लागत आहे. 

नागरिकांना लवकरात लवकर फिटनेस सर्टिफिकेट मिळण्यासाठी प्रयत्न करेन, याबरोबरच निरीक्षकांची चौकशी करण्यात येईल.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चिखली आरटीओ कार्यालय

Web Title: rto not give to fitness certificate