'आरटीओ'मध्ये पुन्हा आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारातील एका खोलीत ठेवलेली नवीन वाहन नोंदणीची कागदपत्रे मंगळवारी सकाळी आगीत खाक झाली. या खोलीस आग लागण्याची पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे.

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारातील एका खोलीत ठेवलेली नवीन वाहन नोंदणीची कागदपत्रे मंगळवारी सकाळी आगीत खाक झाली. या खोलीस आग लागण्याची पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे.

संबंधित खोलीतील कागदपत्रांना मागील आठवड्यात बुधवारी आग लागली होती. त्यामध्ये अनेक कागदपत्रे जळाली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी नऊ वाजता या खोलीतून धूर निघू लागला. त्यानंतर आरटीओमधील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाण्याचा मारा करून आग आटोक्‍यात आणली. तसेच खोलीमधील धूर बाहेर जाण्यासाठीची व्यवस्था केली. मात्र आगीमध्ये नव्याने नोंदणी केलेल्या वाहनांची कागदपत्रे खाक झाली.

वीजवाहिन्या नव्याने बसवा
वाहन नोंदणीची कागदपत्रे ठेवलेल्या खोल्यांच्या अंतर्गत वीजवाहिन्या जुन्या झाल्या असून, त्यांची रचना सदोष आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीच्या घटना घडत असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संबंधित खोल्यांमधील अंतर्गत वीजवाहिन्या नव्याने बसविण्याबरोबरच कागदपत्रे ठेवण्यासाठी लोखंडी जाळ्यांचा वापर करावा, अशी सूचना अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी केली.

Web Title: RTO office fire