आरटीओच्या तिजोरीत हौसेचं देणं...!

सचिन बडे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

चॉइस नंबरसाठी लाखोंची उड्डाणे; सात महिन्यांत १३ कोटी ७५ लाख जमा
पुणे - नवी गाडी घेतल्यावर तिला आवडीचा नंबर मिळविण्यासाठी हौशी वाहनचालक वाहनांच्या किमतीइतकी अधिक रक्कम मोजण्यासाठी तयार आहेत. ‘१’ क्रमांकासाठी तर तब्बल चार लाख रुपये वाहनचालकांनी मोजले आहेत. त्यामुळे हौसेला मोल नाही, या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती येत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तिजोरीत एका वर्षात २३ कोटी ७६ लाखांची भर पडली आहे. 

वाहनांना आवडीचा क्रमांक घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. आवडीच्या क्रमांकांमध्ये सर्वाधिक महाग क्रमांक ‘०००१’ असून, त्यासाठी वाहनमालक ४ लाखांपेक्षा अधिकची रक्कम देत आहेत; तर दुचाकी वाहनमालक हा क्रमांक ५० हजार रुपये देऊन घेत आहेत. पुणेकरांच्या सर्वाधिक पसंतीचे क्रमांक ०००९, ००९९, ०९९९ व ९९९९ हे आहेत. त्यासाठी वाहनचालक किमान दीड लाख रुपये खर्च करत आहेत. दुचाकीचे मालक २० हजारांहून अधिक रक्कम मोजत आहेत. त्याचबरोबर १११, २२२, ३३३ अशा क्रमांकासाठी चारचाकीचे शौकीन ७५ हजार, तर दुचाकीमालक १५ हजारांपेक्षा अधिक रक्कम खर्च करत आहेत.

नागरिकांमध्ये आकर्षक क्रमांकाची आवड आहे. हे क्रमांक मिळविण्यासाठी लागेल तेवढी रक्कम खर्च करण्याची त्यांची तयारी असते. मोठ्या प्रमाणात खर्च करून वाहनमालक त्यांना हवा तो क्रमांक घेतात.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: RTO Revenue Vehicle Choice Number Amount