पुणे - जुन्नर येथे आरटीओचे सेवा केंद्र सुरू                  

दत्ता म्हसकर
बुधवार, 4 जुलै 2018

जुन्नर (पुणे) : 'सर्व सामान्यांची आर्थिक अडवणूक न होता आर.टी.ओ.च्या विविध सेवा शासकीय दराने तत्परतेने मिळतील असे पिंपरी-चिंचवड आरटीओ विभाग प्रमुख आनंद पाटील यांनी सांगितले. 

जुन्नर येथे डिजिटल इंडिया अंतर्गत आर.टी.ओ. सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरटीओ अधिकारी चंद्रकांत जावळकर, गुलजार शेख , नगराध्यक्ष शाम पांडे, सी.एस.सी. महाराष्ट्र प्रमुख वैभव देशपांडे , नगरसेवक समीर भगत ,नंदकुमार तांबोळी, किरण परदेशी, सलीम गोलंदाज,रवींद्र काजळे आदीं मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते. 

ते म्हणाले, 'डिजिटल इंडिया शासन आपल्या दारी' अंतर्गत आरटीओ च्या 90 टक्के सेवा ऑनलाइन झालेल्या असून या करिता आवश्यक शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे. ऑनलाइन सेवा 24 तास उपलब्ध राहणार आहेत. सर्व कारभार पारदर्शक राहणार असल्याने कोणाची आर्थिक अडवणूक होणार नाही. या सेवा केंद्रातून आरटीओच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन आनंद पाटील यांनी यावेळी केले.

डिजिटल इंडिया अंतर्गत जुन्नरमध्ये हे सेवा केंद्र सुरू करण्यात आलेल्या असून आरटीओ सेवांबरोबरच पासपोर्ट, रेल्वे, विमान हॉटेल बुकिंग तसेच विविध टॅक्स भरणा, बँकिंग इन्शुरन्स आदी 356 डिजिटल सेवा अल्पदरात मिळणार असल्याचे वैभव देशपांडे यांनी सांगितले. सीएससी सेंटर जुन्नरचे संचालक रज्जाक सय्यद यांनी आभार मानले.

Web Title: RTO service center starts in junnar pune