‘आरटीओ’ची यंत्रणा ‘डिसकनेक्‍ट’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

पुणे  - प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) संगणक यंत्रणेच्या कनेक्‍टिव्हिटीच्या समस्येने कर्मचारी त्रस्त झाले असून, या दुरवस्थेचा फटका नागरिक व व्यावसायिकांना बसत आहे. इतकेच नव्हे, तर कित्येकांना वेळेत कर व शुल्क न भरता आल्याने दंडाचा भुर्दंडही सोसावा लागला.

आरटीओतील संगणकांसाठी बीएसएनएलची ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा आहे. बीएसएनएलच्या लाइनमध्ये बिघाड आला की, ही यंत्रणा ठप्प होते. गेल्या आठवड्यात याच कारणास्तव अनेकदा कामकाज बंद पडले होते, असे वाहनचालक- मालक संघाचे सचिव प्रकाश जगताप यांनी सांगितले.

बीएसएनएलच्या इंटरनेटमध्ये अडथळे येत असल्याने इतर इंटरनेट सुविधा पुरवठादारांकडून पर्यायी जोड घेण्याबाबत विचार सुरू असून, तसा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.

फीची माहिती नोंदविणारे (इनवर्ड करणारे) संगणकही सुरू न झाल्याने नागरिकांचा खोळंबा झाला होता.

लवकरच त्रुटी दूर होतील
इंटरनेटप्रमाणेच लागू करण्यात आलेल्या नव्या संगणक प्रणालींमध्येही अनेक त्रुटी आहेत. जुन्या वाहनांची माहिती नव्या प्रणालीत अपलोड होत नसल्याने कित्येक वाहनांचे हस्तांतरण थांबले असल्याचे मान्य करत लवकरच या त्रुटी दूर होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यंत्रणेतील बिघाडामुळे वेळेत कर वा शुल्क भरणा करता न आलेल्या नागरिकांना दंडातून सवलत देण्याचे अधिकार कोणालाच नाहीत, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यापलीकडे अधिकारी काहीच करू शकत नाहीत.
- विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: rto system disconnect