रूग्णालयांसोबतचे नाते तोडण्याची तंबी; आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी 

rubal agrwal
rubal agrwal

पुणे - खासगी रुग्णालयांमधील आयसीयू आणि ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेने प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनाच रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. "रुग्णालयांमध्ये जाऊन मोकळ्या बेड मिळवा, त्यात तुमचे हितसंबंध आणू नका, अशा रूग्णालयांसोबतचे नाते तोडा,' अशी सूचनावजा तंबीच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सहायक आरोग्य प्रमुखांसह डॉक्‍टरांना दिली आहे. 

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमधील अधिकाधिक जागा ताब्यात घेण्याची सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका केल्या आहेत. त्यानुसार तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आदेश काढत 81 खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आजपर्यंत जेमतेम सव्वापाच हजार बेड ताब्यात आल्या आहेत. याच रुग्णालयांमधील आणखी दीड ते दोन हजार बेड मिळण्याची आशा आहे. याबाबत अग्रवाल यांनी आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा रुग्णालय व्यवस्थापनाला पाठीशी न घालण्याच्या सूचना केली आणि त्यांच्याशी एकाही अधिकाऱ्यांनी कोणतेही संबंध ठेवू नयेत, हे ही सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाइन शॉप "सील' 
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील "वाइन शॉप'भोवती गर्दी होऊन सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित "वाइन शॉप' गुरुवारी "सील' केले. सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क नसणे, एकाच ठिकाणी पाच-सहा लोक एकत्र आल्याने ही कारवाई केली असून, यानिमित्ताने सुरक्षिततेचे उपाय न पाळणाऱ्या व्यावसायिकांना इशाराच दिला. अशा प्रकारची कारवाई शहरात सर्वत्र केली जाणार असल्याचे रूबल अग्रवाल यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com