रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी सहभाग नोंदविला. येथील अँजेल्स पॅरॅडाईस अकॅडेमि, आमनोरा नॉलेज फौउंडेशन आणि इंडियन क्युब असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. 

यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, सिटी कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे, जे. के. भोसले, श्रेयस भोसले, सायली भोसले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.

स्पर्धेमध्ये लहानात लहान चार वर्षाच्या मुलापासून एक्काहत्तर वयाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. 
स्पर्धेच्या हेतूबाबत माहिती देताना जिनिअस किड्सचे संचालक आनंद महाजन म्हणाले, "क्युब खेळाने विद्यार्थ्यांमधील आकलन शक्ती वाढण्यास मोठी मदत होते. त्यामुळे जगातील 128 देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. जिल्ह्यातील शाळांमध्ये या क्रिडा प्रकाराबाबत जागृती होण्याची गरज आहे. पुढील वर्षी शहरात गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.'' 

Web Title: Rubik Cub championship competition