महिलांबद्दल असभ्य बोलणे अयोग्य

महिलांबद्दल असभ्य बोलणे अयोग्य

पुणे - कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याने महिलांबद्दल असभ्य भाषेत बोलणे योग्य नाही, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केले. भाजपच्या उत्तर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर रहाटकर यांनी कार्यकर्त्यांना घरचा आहेर दिला आहे. 

रहाटकर म्हणाल्या, ‘‘महिलांबद्दल कुणीही असभ्य वक्‍तव्य करणे गैर आहे. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनीदेखील यापूर्वी महिलांबद्दल केलेली अशी विधाने लक्षात घ्यायला हवीत.’’ 

गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मोठी कामगिरी केली आहे. पक्षाचे हे काम घराघरांत पोचविण्यासाठी येत्या महिनाभरात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. कमल ज्योती संकल्प मोहीम राबविण्यात येणार असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. 

पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही आज पुण्यात झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

‘सरोगसी’वर आज राष्ट्रीय परिषद
राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘सरोगसी’ या विषयावर उद्या (ता.३१) एक दिवसाची राष्ट्रीय परिषद होणार आहे, असे रहाटकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com