सात वर्षांच्या रुद्रकडून अवघड तीन किल्ले सर

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 16 जानेवारी 2019

खडकवासला - चढाई-उतरणीला अवघड असलेल्या किल्ल्यांच्या यादीतील अलंग, मदन, कुलंग हे तीन किल्ले सर करीत सात वर्षांच्या रुद्र खोबरे या मुलाने ही मोहीम यशस्वी केली. 

खडकवासला - चढाई-उतरणीला अवघड असलेल्या किल्ल्यांच्या यादीतील अलंग, मदन, कुलंग हे तीन किल्ले सर करीत सात वर्षांच्या रुद्र खोबरे या मुलाने ही मोहीम यशस्वी केली. 

रुद्र हा सिंहगड रस्ता परिसरात राहतो. तो नऱ्हे येथील अभिनव इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो. अलंग किल्ल्याचा अंदाजे साठ फुटी कातळ कड्याचा टप्पा दोराच्या साहाय्याने चढणे आणि उतरणे हे आजही भल्याभल्यांना धडकी भरविणारे आहे. तर, मदन किल्ला चढताना आणि उतरताना एका बाजूला पायऱ्यालगतच दिसणारी खोल दरी निश्‍चितच घाबरून टाकते. मात्र, सर्व आव्हांना पेलवत घोंघावणा-या वाऱ्याच्या तालावर रुद्र सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर मुक्त बागडला. या मोहिमेत त्याला वाइल्ड ट्रेक ॲडव्हेंचर्सचे प्रसाद वाघ आणि प्रसन्न वाघ यांनी मार्गदर्शन केले. मोहिमेत रुद्रला त्याचे वडील रवींद्र खोबरे यांनीदेखील उत्तम मार्गदर्शन केले. ही मोहीम दीड दिवसात पूर्ण करण्यात आली. याबाबत रुद्र म्हणाला, की हे तिन्ही किल्ले सर करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. मात्र, उत्तम मार्गदर्शनामुळे हे शक्‍य झाले. आतापर्यंत मी केट पॉइंट ते कमळगड, राजगड, भिरा येथील देवकुंड, वासोटा, अंदरबन, असे ट्रेक केले आहेत.

 

Web Title: Rudra Khobare Fort Tracking Success Motivation