नियम पाळा; फोटो टाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे - किमान काही नियमांचे पालन व्हावे आणि वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशातून पुणे वाहतूक पोलिस आणि रोटरी क्‍लबच्या वतीने ‘सकाळ’च्या पुढाकारातून आजपासून शहरात अभिनव अभियान सुरू करण्यात आले. यात नियम मोडणाऱ्या वाहनांची छायाचित्रे काढून ती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शिवाय पोलिसांकडून या वाहनचालकांना त्वरित नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी नियम पाळल्यास, त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध होणे आणि नोटिसा मिळणे टाळता येणार आहे; तर नियम पाळणाऱ्यांचा तेथेच सन्मानही करण्यात येणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील नवश्‍या मारुती चौक हा प्रचंड वर्दळीचा आहे. येथूनच आज या अभियानाची सुरवात झाली. रोटरी क्‍लब ऑफ पुणे हेरिटेजचे प्रफुल्ल देशपांडे, जयवंत शिंत्रे, पुरुषोत्तम बापट, अजय झाड, केदार शिंत्रे, संगीता काकडे यांच्या चमूने सकाळपासूनच चौकात हजेरी लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची छायाचित्रे काढली. आपण खुलेआमपणे वाहतुकीचे नियम वाहनांच्या चाकाखाली तुडवत आहोत, याचे भान कित्येक वाहनचालकांना नसल्याचे आढळून आले. लाल दिवा लागला असताना पुढे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. विशेष म्हणजे वेग कमी करण्याची तसदीही ते घेत नव्हते. ९ ते १० वाजण्याच्या प्रचंड वर्दळीच्या वेळेत शंभरपेक्षा अधिक छायाचित्रे या चमूने काढली. 

सिंहगड रस्त्यावरील नवश्‍या मारुती चौकात नियम पाळणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के, तर बेशिस्त वाहनांचे प्रमाण तब्बल ७० टक्के आढळून आले. पेट्रोल पंप आणि पु. ल. देशपांडे उद्यान या दोन्ही बाजूंनी वाहनचालक सर्रासपणे ‘नो एन्ट्री’तून घुसतात. 

- पुरुषोत्तम बापट, रोटरी क्‍लब ऑफ पुणे हेरिटेज

फक्त एवढे करा...
सिग्नल यंत्रणेचा सन्मान राखा
सिग्नलला वाहने ‘स्टॉपलाइन’च्या अलीकडे उभी करा
नागमोडी पद्धतीने वाहने चालवून इतरांनाही धोका निर्माण करू नका
रुग्णवाहिकेला वाट द्या
‘नोट एन्ट्री’तून जाऊ नका
‘नो पार्किंग’मध्ये वाहने लावू नका

Web Title: Rule follow avoid photo