जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शुक्रवारी नियमावली

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
pune
punesakal

पुणे : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सुचनांबाबतची नवी नियमावली तयार केली जाणार आहे. ही नियमावली निश्‍चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती स्थापन करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा समितीची बैठक येत्या शुक्रवारी (ता.१३) बोलाविली आहे. (Pune News)

जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) स्मिता गौड आणि अन्य काही शिक्षणतज्ज्ञांचा या समितीत समावेश आहे. या बैठकीत शाळा सुरु करताना शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी. ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समित्यांनी काय करावे, याबाबतची मार्गदर्शक नियमावलीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी सांगितले.

pune
पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोध

कोरोना निर्बंधांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सरकारी व खासगी प्राथमिक शाळांमधील ऑफलाईन शिक्षण मागील सुमारे सोळा महिन्यांपासून बंद आहे. तेव्हापासून आजतागायत केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. यामुळे २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन शैक्षणिक वर्षात वार्षिक परीक्षासुद्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे केवळ ऑनलाईन च्या माध्‍यमातून या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनच्या काळात ऑफलाईन शाळा पूर्णपणे बंद होत्या. परंतु पहिली लाट ओसरल्यानंतर मध्यंतरी प्राथमिक शाळांमधील सहावीपासूनचे वर्ग आणि सर्व माध्यमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला विद्यार्थी आणि पालकांकडून फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. दरम्यानच्या काळात कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुरु झालेल्या शाळाही पुन्हा बंद झाल्या.

pune
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मृत्यूचा सापळा

दरम्यान, २ ऑगस्टपासून कोरोनाचे निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले आहेत. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी येत्या १७ ऑगस्टपासून पुन्हा ऑफलाईन शाळा सुरु करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ग्रामीण भागातील सहावी ते बारावी तर, शहरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार आहेत.

जिल्ह्यात १८३० शाळा सुरु होणार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा

परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित व विनाअनुदानित मिळून १ हजार ८३० प्राथमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण प्राथमिक शाळांपैकी ६९ शाळांमध्ये आठवीचा वर्ग आहे. यानुसार येत्या १७ ऑगस्टपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १ हजार ८३० शाळांमध्ये पुन्हा ऑफलाईन अध्यापन पद्धतीने शिक्षण मिळू शकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com