आचारसंहितेचे नियम धाब्यावर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या घटनांची चौकशी करून संबंधित उमेदवारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या मुख्य आचारसंहिता कक्षाच्या माध्यमातून ही कार्यवाही केली जात आहे. शिवाय, भरारी पथकेही नेमली आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग 
होऊ नये, यासाठी जागोजागी "सीसीटीव्ही कॅमेरे' बसविण्यात आले आहेत. 
- विलास कानडे, प्रमुख, आचारसंहिता कक्ष

पुणे - आचारसंहितेकडे काणाडोळा करीत महापालिका निवडणुकीतील राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारफेऱ्यांसाठी नियमापेक्षा अधिक वाहने वापरत असल्याचे आढळून आले आहे. अशा 11 उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांविरोधात महापालिकेने गुन्हे दाखल केले आहेत, तर दोन जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर पुढील आठवडाभर पथकांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. 

कोथरूड आणि पर्वती परिसरात बेकायदा वाहन रॅली काढल्याप्रकरणी दोन उमेदवारांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली असून, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले. 

महापालिका निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरवात केली असली तरी आचारसंहितेनुसार त्यांच्यावर बंधने घालण्यात 
आली आहेत; परंतु मतदानाला जेमतेम नऊ दिवस राहिले असल्याने प्रचाराला वेग आला आहे. प्रभागांमध्ये वाहन रॅली काढण्यावर उमेदवारांचा भर आहे. अशा रॅलीमध्ये नेमकी किती वाहने असावीत, त्यांचे स्वरूप काय असावे हे ठरवून देण्यात आले आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत वाहनांचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अशा 12 उमेदवारांविषयी महापालिकेच्या आचारसंहिता कक्षाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 9 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आणि महापालिकेचे सहआयुक्त विलास कानडे यांनी दिली. 

नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या घटनांची चौकशी करून संबंधित उमेदवारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या मुख्य आचारसंहिता कक्षाच्या माध्यमातून ही कार्यवाही केली जात आहे. शिवाय, भरारी पथकेही नेमली आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग 
होऊ नये, यासाठी जागोजागी "सीसीटीव्ही कॅमेरे' बसविण्यात आले आहेत. 
- विलास कानडे, प्रमुख, आचारसंहिता कक्ष

Web Title: Rules on the roof of the Code of Conduct