Loksabha 2019 : पुण्यात चिठ्ठीतही भाजप

pune.jpg
pune.jpg

पुणे : महापालिकेतील 15 पैकी 12 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून सत्ताधारी भाजपने सत्तेत आपला पहिला क्रमांक टिकविला. विशेष म्हणजे, एका समितीसाठी झालेल्या 'चिठ्ठी'च्या माध्यमातून भाजपला बोनस मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडे तीन समित्यांचे अध्यक्षपद आले. या समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी सोमवारी निवड झाली. या निवडणुकीत उमेदवार देऊन भाजपविरोधात दंड थोपटण्याची तयारी केलेल्या शिवसेनेनेही भाजपला साथ दिली. त्यामुळे महापालिकेत भाजप-शिवसेनेच्या नेत्यांचे सूर पुन्हा जुळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महापालिकेच्या 15 प्रभाग समित्यांची मुदत संपल्याने त्यासाठी निवडणूक झाली. प्रभाग समित्यांमधील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 11 समित्यांचे अध्यक्षपद अपेक्षित आले. या जागांवरचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर विरोधी पक्षांचे उमेदवारांना तीन जागांवर विजय मिळाला. त्यानंतर ढोले पाटील प्रभाग समितीसाठी काढलेल्या चिठ्ठीत भाजपच्या मंगला मंत्री यांचे नाव निघाले. 

नव्या अध्यक्ष प्रभाग समिती 
ज्योती कळमकर औंध-बाणेर 
आदित्य माळवे शिवाजीनगर-घोले रोड 
निता दांगट सिंहगड रस्ता 
रत्नप्रभा जगताप वानवडी-रामवाडी 
मनिषा कदम कोंढवा-येवलेवाडी 
स्मिता वस्ते कसबा-विश्रामबागवाडा 
प्रवीण चोरबेले बिबवेवाडी 
मारुती सांगडे येरवडा-कळस-धानोरी 
छाया मारणे कोथरुड-बावधन 
मुक्ता जगताप नगर रस्ता-वडगावशेरी 
मंगला मंत्री ढोले-पाटील रस्ता 
दिशा माने धनकवडी-सहकारनगर 
जयंत भावे वारजे-कर्वेनगर 
पूजा कोद्रे हडपसर-मुंढवा 
सुलोचना कोंढरे भवानी पेठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com