Burning Car: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात धावत्या कारला आग

Burning_Car
Burning_Car

पुणे : हडपसरच्या दिशेने जाणाऱ्या एका धावत्या कारला आग लागली. मंगळवारी (ता.23) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घटली. गाडीच्या इंजिनने पेट घेतला होता. पण गाडीतील दोघेजण तत्काळ बाहेर आल्याने मोठी दुर्घटना टळली. औंध अग्निशामक दलाच्या जवानानी काही वेळातच आग विझविली. ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात घडली.

अमित मिटकरी यांच्यासह दोघेजण त्यांच्या कारमधून (एमएच 14 सिसी 8484) मुंबईहून आले होते. ते औंधवरुन हडपसरच्या दिशेने जात होते. त्यांची कार विद्यापीठ चौकात आल्यानंतर इंजिनला अचानक आग लागली. प्रसंगावधान राखत मिटकरी व अन्य एकजण कारमधुन तत्काळ बाहेर पडले. त्यानंतर अग्निशामक दलास खबर देण्यात आली. तेथे दाखल झालेल्या औंध अग्निशामक दलाचे संदीप कळमकर, संजय शेवाळे व दत्तात्रय कदम यांनी काही वेळातच आग विझविली. गाडीचे इंजिन गरम झाल्याने आग लागली असल्याचे कळमकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com