गॅसदरवाढीवर रुपाली ठोबरेंचं खोचक ट्विट, म्हणाल्या...

महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला असे म्हणत त्यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Rupali Patil-Thombare
Rupali Patil-Thombareesakal

पुणे : एककडे दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या (LPG Gas) दरामध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनीदेखील ट्वीट करत भाजपसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Rupali Patil Thombare Tweet On LPG Gas Hike)

रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला. चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे ,गॅस मध्येच भरमसाठ वाढ झाली. परत चुलीकडे जावेच लागणार,पोटाचा प्रश्न आहे ना. कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र #Shame #BJP_हटाओ_देश_बचायो असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Rupali Patil-Thombare
HDFCच्या गृहकर्जदारांना झटका; व्याजदरात वाढ

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आजपासून ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १४.२ किलोच्या एका सिलेंडरसाठी आजपासून ९९९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. हे भाव आजपासूनच लागू होत आहेत. याआधी व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीत १०२ रुपयांची वाढ झाली होती. १ मेपासून ही वाढ लागू झाली असून आता घरगुती सिलेंडरही ५० रुपयांनी महागला आहे.

दरम्यान इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. यापूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यापासून कधीही घरगुती सिलेंडरच्या किमती वाढणार, अशी कुणकुण लागून राहिलेली होतीच. त्यानंतर आता ही मोठी दरवाढ झाली आहे. पूर्वी विनाअनुदानित गॅससाठी ९४० - ९७० रुपये मोजावे लागत होते. हे दर देशातल्या विविध भागांत वेगवेगळे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com