ग्रामीण भागातील व्यक्तींना कोरोनाबाबत ज्ञान किती? झेडपी करणार सर्वेक्षण

पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी ग्रामीण भागात मात्र अजूनही म्हणावी तेवढी ही लाट ओसरलेली दिसत नाही.
Pune ZP
Pune ZPSakal

पुणे - पुणे शहर (Pune City) व पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) ओसरली असली तरी ग्रामीण भागात मात्र अजूनही म्हणावी तेवढी ही लाट ओसरलेली दिसत नाही. यासाठी कदाचित ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाबाबतचे (Corona) ज्ञान नसणे, हा घटक कारणीभूत असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत जनजागृती करणे आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यक्तींना कोरोनाबाबत किती माहिती आहे, हे आता सर्वेक्षणाच्या (Survey) माध्यमातून जाणून घेतले जाणार आहे. याबाबत सर्वेक्षण करण्याची सूचना कोरोनाविषयक विभागीय जनजागृती समितीचे अध्यक्ष आणि राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पुणे जिल्हा परिषदेला केली आहे. (Rural Area People Corona Knowledge Zp Survey)

डॉ. कलशेट्टी यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्यावतीने हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. कोरोना महामारीशी लढण्यासाठी हे सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे याच्या माध्यमातून ग्रामीण व्यक्तींचे कोरोनाविषयक ज्ञान, त्यांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कार्यपद्धती आदी मुद्यांची माहिती जमा केली जाणार आहे.

Pune ZP
कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथांच्या हक्कांसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका

यामुळे कोरोनाविषयक असलेल्या ज्ञानाच्या पातळीसोबतच लोकांच्या दैनंदिन जीवनातील वागणूकही समजून घेण्यास मदत होणार आहे. शिवाय या महामारीमुळे लोकांमध्ये अनर्थाची भीती आणि तणाव निर्माण झालेला तणाव कमी करण्यास आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकणार असल्याचे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.

या सर्वेक्षणात व्यक्तीचे नाव, त्यांचे व्यवसाय, वयोगट, उत्पन्नाचा गट, त्यांची पार्श्वभूमी आदींची माहिती संकलित केली जाणार आहे. याचा उपयोग जनजागृतीसाठीचा कृती आराखडा अद्ययावत करण्यासही होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com