केरळमध्ये ग्रामीण भाग अद्याप मदतीपासून वंचितच 

ज्ञानेश सावंत
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कोची : अचानक थैमान घातलेल्या महापुरात केरळवासीयांना सर्वस्व गमवावे लागले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने स्थानिक यंत्रणा काम करीत आहेत; मात्र ग्रामीण भागांमध्ये ती पोचत नसल्याची लोकांची तक्रार आहे.

आमच्या घरांचे एवढे नुकसान झाले. मात्र एकही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे आम्हीच आम्हाला सावरत आहोत, असे गाऱ्हाणे पूरग्रस्त, माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडत आहेत. तेव्हा शेजारीच असलेल्या सरकारी अधिकाऱ्याकडे चौकशी केली. मात्र निवासी व्यवस्था केल्याचे सांगून त्यांनी हात झटकले. मात्र पूरग्रस्तांना मदतीची अपेक्षा आहे. 

घरात शिरलेल्या पाण्यात घर, जमीन, सोने-नाणे आणि वाहनेही वाहून गेल्याने ही हानी पैशांमध्ये मोजता येणार नाही. शहरे-गावांमधील रस्ते, वीज, आरोग्य यंत्रणाही बुडाल्या असून, या मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज बांधणे शक्‍य नसल्याचे आढळून येत आहे. तरीही सरकारी दफ्तरी मात्र सहा जिल्ह्यांतील 80 गावांमधील 45 ते 50 हजार कोटींचा हिशेब मांडण्यात आला आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील सरकारी अधिकारी डॉ. राजा यांनी त्यास दुजोरा दिला. 

वाहन उद्योग, इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठांना फटका 

येथील वाहन उद्योगालाही जबरदस्त तडाखा बसला असून, नव्या वाहनांची दालने चार-पाच दिवस पाण्यात राहिल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. हा उद्योग जवळपास 8 हजार कोटी रुपयांनी बुडाल्याचे कनूरमधील वाहन कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले. इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठांच्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी. 

नुकसानाचा अंदाज 

रस्ते : 5,500 कोटी 
वीज : 1300 कोटी 
आरोग्य : 400 कोटी 
पाणी : 700 कोटी 
वाहन उद्योग : 3500 कोटी 
इलेक्‍ट्रॉनिक : 3000 कोटी 

Web Title: Rural areas in Kerala are still not able to help