'कुलगुरूंनो, निधी वापरा, पण शिक्षणाचा दर्जा वाढवा'; प्रकल्प संचालकांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

शैक्षणिक गुणवत्ता व विद्यापीठात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 'रूसा'तर्फे विद्यापीठांना कोट्यवधींचा निधी दिला जातो; परंतु काही विद्यापीठांनी तो वापरला नाही.

पुणे : शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व अकृषीक विद्यापीठांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारची मदत कशी घ्यावी, यावरील चर्चेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 21 कुलगुरू उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या वेळी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रूसा) दिलेल्या निधीचा डिसेंबरपर्यंत पूर्ण वापर करावा आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश कुलगुरूंना 'रूसा'चे प्रकल्प संचालक पंकज कुमार यांनी दिले.

- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 'रॉकी'च्या रूपात

या बैठकीला विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, राज्याचे उच्च व तंत्र सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह अकृषीक विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. 

- अजित पवार सभागृहातच भडकले; जितेंद्र आव्हाडांची 'सिंपल मिस्टेक'

सर्व विद्यापीठांनी एकात्म संगणकप्रणाली अमलात आणावी, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक संस्थांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाचे मूल्यमापन करणे, 'एआयसीटीई'च्या गुणवत्ता निर्देशांची अंमलबजावणी करणे याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार काम करण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्या.

- फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता धोनी म्हणाला,...

15 विद्यापीठांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता व विद्यापीठात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 'रूसा'तर्फे विद्यापीठांना कोट्यवधींचा निधी दिला जातो; परंतु काही विद्यापीठांनी तो वापरला नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत हा निधी मार्गी लावावा, अशी सूचना दिली आहे. 

- शास्त्रज्ञांना सापडला तब्बल 18 हजार वर्षे जुना श्वान 

पुणे विद्यापीठ अग्रेसर 
दरम्यान, एका कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ''सरकारतर्फे पुणे विद्यापीठात राज्यातील कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व इतर मुद्यांवर चर्चा झाली. इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ अग्रेसर आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rusa project director Pankaj Kumar ordered to vice chancellors for fund utilisation