पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ए. एस. राजीव यांनी आज कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते इंडियन बॅंकेचे कार्यकारी संचालक होते.
ए. एस. राजीव यांनी सिंडिकेट बॅंक, तसेच विजया बॅंकेसाठीही काम पाहिले असून, व्यावसायिक बॅंकिंगमध्ये त्यांना तीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या ए. एस. राजीव यांना कॉर्पोरेट क्रेडिट, आंतरराष्ट्रीय बॅंकिंग, ट्रेझरी, जोखीम व्यवस्थापन, क्रेडिट देखरेख व पर्यवेक्षण, एनपीए व्यवस्थापन, नियोजन आणि विकास, कॉर्पोरेट प्रशासन, तपासणी व लेखापरीक्षण, सायबर सुरक्षा अशा बॅंकिंगमधील सर्व महत्त्वाच्या विभागांतील कामाचा विस्तृत अनुभव आहे. ए. एस. राजीव हे गणित पदवीधर असून, सोबतच एफसीए, एमबीए, डीआयएसए आणि सीएआयआयबी पात्र आहेत.
|