एस. एस. विर्क यांचे  आज पुण्यात व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

‘सकाळ साप्ताहिक’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी  (ता. २) महाराष्ट्र व पंजाब राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांचे व्याख्यान होणार आहे.

पुणे - ‘सकाळ साप्ताहिक’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी  (ता. २) महाराष्ट्र व पंजाब राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांचे व्याख्यान होणार आहे. ‘अंतर्गत सुरक्षा- सद्यःस्थिती आणि आव्हाने’ या विषयावर ते बोलणार आहेत. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

पंजाबमध्ये विर्क यांनी वरिष्ठ जिल्हा पोलिस अधीक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहासंचालक म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी पंजाबचे पोलिस महासंचालकपदही भूषविले. विर्क सध्या ‘सकाळ’च्या सप्तरंग  पुरवणीत पोलिसदलातील त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला लिहीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: S. S. Virk speech in Pune today