#SaathChal "साथ चल''साठी हडपसरकरांचा निर्धार

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 3 जुलै 2018

मांजरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह व फिनोलेक्स केबल्स यांच्या वतीने आयोजित "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची'' ही संकल्पना घेऊन वारीच्या वाटेवर "साथ चल'' हा उपक्रम राबविला जात आहे. हडपसर-वानवडी परिसरातून या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळत असून नागरिकांमध्ये त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

मांजरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह व फिनोलेक्स केबल्स यांच्या वतीने आयोजित "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची'' ही संकल्पना घेऊन वारीच्या वाटेवर "साथ चल'' हा उपक्रम राबविला जात आहे. हडपसर-वानवडी परिसरातून या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळत असून नागरिकांमध्ये त्याबाबतची उत्सुकता वाढली आहे. विविध शाळा महाविद्यालये, राजकीय संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणपती मंडळे, सामाजिक संस्था, रोटरी व लायन्स क्लब, महिला बचत गट, स्थानिक कलाकार, खेळाडू, डाॅक्टर, व्यापारी, कामगार, शिक्षक, वकील, ज्येष्ठ नागरिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी या उपक्रमाबाबत सकारत्मकता दाखवून त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.

विठुरायाच्या वारीसाठी चालण्याचा आनंद व समाधान वेगळेच चैतन्य देवून जाते. मात्र, त्याच बरोबर आपल्या आई-वडिलांचे चांगले संगोपन आणि कुटुंबाचे स्वास्थ्य टिकून राहवे यासाठी पालखी सोहळ्यातून दोन पावले चालण्याची केवळ संकल्पनाही मनाला समाधान देवून जाते. त्यासाठी सकाळ व फिनोलेक्सने आयोजित केलेल्या ""साथ चल'' उपक्रमाचे चोहोबाजूंनी स्वागत होत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकाळकडून होत असलेल्या आवाहानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुलगेट, वानवडी, घोरपडी, हडपसर, मांजरी, मुंढवा, केशवनगर, साडेसतरानळी, फुरसुंगी, वडकी, कोंढवा या मुख्य गावांसह छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्या व उपनगरातून सकाळच्या या दिंडीत सहभागी होत असल्याचे निर्धार व्यक्त केले जात आहेत. 

सकाळ कार्यालयात या भागातील नगरसेवक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर, पालिकेतील विरोधीपक्ष नेते नगरसेवक चेतन तुपे, योगेश ससाणे, हडपसर प्रभागाध्यक्षा हेमलता मगर, उज्वला जंगले, अॅड. हाजी गफूर पठाण, लता धायारकर, मंगला मंत्री, नंदा लोणकर, कालिंदा पुंडे, दिनेशप्रसाद होले, अभिजित शिवरकर, विक्रम लोणकर, राजाभाऊ होले, मिलींद काची, डाॅ. शशिकांत वाडेकर, रविंद्र वाडेकर, उत्तम लोणकर, वसंत तांबे, दिलीप झगडे, अशोक नलगिरे, राजेंद्र गायकवाड, प्रवीण खंडाळकर, अशोक राठी, विकास बधे, रमेश राऊत आदींनी यावेळी आपापल्या भागातील नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी करणार असल्याचा निर्धार केला आहे. 

"पोलीस फ्रेंड परिषद व भारत विकास परिषद पालखी सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असते. या वर्षी या कामाबरोबरच साथ चल उपक्रमात सहभाग घेण्याचे ठरविले आहे. ज्ञान प्रबोधिनी शाळेचे विद्यार्थीही सहभागी होणार आहेत.''
रविंद्र वाघ, प्रचार्य, ज्ञानप्रबोधिनी शाळा

"महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी साथ चल उपक्रमात सहभाग घेण्याचा निर्धार केला असून आई-वडिलांसाठी वारीतून दोन पावले चालण्यासाठी ते उत्सुक झाले आहेत. ते मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविणार आहेत.''
डाॅ. शर्मिला चौधरी, प्राचार्या, अण्णासाहेब मगर महाविद्यालय

"साधना शाळेतील विद्यार्थी दरवर्षी दिंडीत सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत असतात. पालखी गेल्यानंतर स्वच्छताही करतात. या वर्षी साथ चल उपक्रमात आईवडिलांसाठी चालण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.''
अजित अभंग, प्राचार्य, साधना विद्यालय 

"मुंढवा-केशवनगर परिसरातून अधिकाधीक तरूण या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी या भागातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, मंडळे, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांचा प्रतिसादही चांगला आहे.''
- दिलीप झगडे, केशवनगर

"येथील स्वामी समर्थ मंदिरात येणाऱ्या परिसरातील नागरिकांना साथ चल उपक्रमात सहभागी होण्यासाठी शपथ दिली आहे. ज्येष्ठ नागरिक, तरूण कार्यकर्ते व महिला सहभागी होणार आहेत.''
सुनील हरपळे, अध्यक्ष, पंचशील मित्रमंडळ, हडपसर

Web Title: saath chal citizens of hadapsar ready for sath chal