#SaathChal ‘साथ चल’ उपक्रमात देहू संस्थानचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

देहू - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या वतीने यंदा आषाढी वारीत निगडी ते पुणेदरम्यान ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची’ ही संकल्पना घेऊन ‘साथ चल’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात भाविकांनी वारीत सहभागी होऊन आई-वडिलांच्या स्वास्थासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा उद्देश आहे. या उपक्रमात देहूतील संत तुकाराम महाराज संस्थान उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. देहूतील देऊळवाड्यात याबाबत बैठक झाली.

देहू - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या वतीने यंदा आषाढी वारीत निगडी ते पुणेदरम्यान ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची’ ही संकल्पना घेऊन ‘साथ चल’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात भाविकांनी वारीत सहभागी होऊन आई-वडिलांच्या स्वास्थासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा उद्देश आहे. या उपक्रमात देहूतील संत तुकाराम महाराज संस्थान उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. देहूतील देऊळवाड्यात याबाबत बैठक झाली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुख, विश्‍वस्त तसेच देहूच्या सरपंच उषा चव्हाण, आकुर्डी विठ्ठल मंदिर समितीचे गोपाळ कुटे, शेखर कुटे उपस्थित होते.

हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे. सध्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग होतो. आपण आध्यात्मिक वाटेवर चालत असताना जन्मदात्यांची आठवण होणे गरजेचे आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्वांना हा संदेश आवडेल. 
- बाळासाहेब मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान 

‘सकाळ’च्या माध्यमातून चांगला संदेश समाजात जात आहे. मुलगा आई-वडिलांकडे वारसा हक्क सांगतो. त्याचप्रमाणे आई-वडिलांसाठी काही करण्याचे मुलांचे कर्तव्य आहे. 
- विठ्ठल मोरे,  सोहळाप्रमुख 

पंढरीची वारी केल्याने  साक्षात पांडुरंगाचे दर्शन  होते. मात्र, वारीत चालणाऱ्या प्रत्येकाने प्रथम घरातील  आई-वडिलांचे दर्शन  घ्यावे. मगच वारी करावी. हा उपक्रम समाजात क्रांती घडवेल.
- अशोक मोरे,  सोहळाप्रमुख

संस्थान या उपक्रमाचे स्वागत करत  आहे. हा वारीतील चांगला उपक्रम आहे. आई-वडिलांच्या सेवेसाठी ‘साथ चल’ या उपक्रमात युवा पिढीने सहभागी व्हावे.
- सुनील दामोदर मोरे,     सोहळाप्रमुख

आई-वडिलांसाठी ‘सकाळ’ राबवीत असलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. जन्मदात्यांचा तो सन्मान आहे. त्यांचा सांभाळ करण्याबाबतचा विचार तरुणांमध्ये रुजविण्याची गरज आहे. 
- जालिंदर मोरे, विश्‍वस्त

वारीत चालताना हा ‘सकाळ’चा संकल्प पुढे आल्यास युवा पिढी आपल्या आई-वडिलांसाठी काहीतरी करेल. परमेश्‍वराच्या नावाबरोबर आई-वडिलांचे स्मरण झाले तर चांगले होईल. 
- अभिजित मोरे, विश्‍वस्त  

सामाजिकदृष्ट्या हा चांगला उपक्रम आहे. समाजात आई - वडिलांचे प्रेम विसरत जाणारा  वर्ग तयार होत आहे. त्यास दिशा देण्याचे काम वारीत होईल.
- सुनील मोरे, विश्‍वस्त 

Web Title: #SaathChal dehu sansthan initiative