#SaathChal माता-पित्यांना आधार देऊ, पुंडलिक होऊ!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - आई-वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या भक्त पुंडलिकाने साक्षात श्री विठ्ठलाला विटेवर उभे केले, अशी कथा आहे. काळाच्या ओघात कथा शिल्लक राहिली; समाजातले भक्त पुंडलिक मात्र हरवू लागले. यंदाच्या वारीच्या निमित्ताने ‘सकाळ’ने समाजातील भक्त पुंडलिकांना हाक दिली आहे आणि या हाकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिला आहे. आईसह समाजातील सर्व पालकांची काळजी घेण्याची शपथ घेत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ या संकल्पनेवर आधारित ‘साथ चल’ उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. बॉलिवूड, उद्योगपती, समाज सेवक आदींसह इतर सर्व क्षेत्रांमधील नागरिकांनी पुढे येत स्वतःच्या तसेच इतरांच्या पालकांची काळजी घेण्याची शपथ घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

फडणवीस हे पत्नीसह वारीमध्ये काही काळ सहभागी होतील. अनेक अडचणींचा सामना करत पालकांची काळजी घेणाऱ्या महाराष्ट्रातील सुपुत्र आणि सुकन्यांचा गौरव करण्यासाठी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम होईल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव होईल.

पालकांची काळजी घेण्याची शपथ घ्या!
आपल्या आणि इतरांच्या पालकांची काळजी घेण्याची शपथ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांना केले आहे. संबंधितांनी आपल्याला पत्र किंवा एसएमएसच्या माध्यमातून याची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारचे पत्र किंवा एसएमएस पाठविणाऱ्यांना पंढरपुरातील विठ्‌ठ्‌लाचा प्रसाद आणि मुख्यमंत्र्यांचे आभाराचे पत्र पाठविले जाईल.

माता-पित्यांनी वाढविले, संस्कार दिले. आता वेळ आहे आपण त्यांना आधार देण्याची. विठुमाउलीच्या साक्षीने हा वसा घेऊया. पुंडलीक होऊया.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: #SaathChal Devendra Fadnavis give response