#SaathChal वारकऱ्यांना मोफत साबण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - वारकऱ्यांना निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘बी स्वच्छ’ या सामाजिक संस्थेतर्फे पाच हजार साबणांचे वाटप करण्यात येणार आहे. ‘सकाळ’च्या ‘साथ चल’ उपक्रमांतर्गत संस्था ही मोहीम राबविणार आहे.  

आळंदी ते पुणे पालखी मार्गादरम्यान वारकऱ्यांना संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत साबण वाटले जाणार आहेत. संस्थेतर्फे पाच वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेने यंदा साबण वाटपाची मोहीम आयोजिली आहे. संस्था तयार करत असलेले २० ते ३० ग्रॅमचे हॅण्डमेड साबण वारकऱ्यांना दिले जाणार असल्याचे ‘बी स्वच्छ’चे अमोल जोशी यांनी सांगितले.

याबाबत संस्थेच्या संस्थापिका रेणुका देशपांडे-चौहान म्हणाल्या, ‘‘सकाळ’च्या ‘साथ चल’ उपक्रमात आम्ही सहभागी होणार आहोत. पालखी मार्गादरम्यान आमच्या संस्थेतील स्वयंसेवक साबणाचे वाटप करतील. दिंडी प्रमुखांना २५ साबण असलेल्या पॅकेटचे वाटप करणार आहोत. संस्थेने पालखीत मोफत पाणी आणि बियांचे वाटप करण्याचा उपक्रम राबविला आहे.’’

Web Title: #SaathChal Free Soap for Warakari