#SaathChal सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पिंपरी - ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची’, या संकल्पनेतून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ उपक्रमास पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, गृहनिर्माण सोसायट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

पिंपरी - ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची’, या संकल्पनेतून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ उपक्रमास पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, गृहनिर्माण सोसायट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

विठुमाउलीचा गजर करीत संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. त्या पार्श्‍वभूमीवर सहा जुलै रोजी निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डी विठ्ठल मंदिर, सात जुलै रोजी आकुर्डी विठ्ठल मंदिर ते फुगेवाडी आणि नऊ जुलै रोजी पुण्यातील पूल गेट ते हडपसर या टप्प्यात ‘साथ चल’ ही अनोखी दिंडी सोहळ्याच्या शेवटी चालणार आहे. या दिंडीचे एक ते दीड किलोमीटरचे टप्पे केलेले आहेत. त्यापैकी कोणत्याही एका टप्प्यात चालून आपल्या आई-वडिलांप्रती आदरभाव पुणेकरांना व्यक्त करता येणार आहे. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी आई- वडिलांचा सांभाळ करण्याबाबत शपथ घेता येणार आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे. 

उपक्रमात यांचाही सहभाग
प्रत्येक टप्प्यात त्या-त्या परिसरातील आजी-माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते,  स्वयंसेवी संस्था, व्यापारी, वकील, उद्योजक, रोटरी क्‍लब, ज्येष्ठ नागरिक महासंघ, साहित्यिक संस्था, महिला मंडळे, रिक्षा संघटना, महापालिका संगीत अकादमीचे शिक्षक- विद्यार्थी व पालक, गृहनिर्माण सोसायट्या, कामगार संघटना, जैन श्रावक संघ, डॉक्‍टर्स, वकील आदींसह श्रीमती गेंदीबाई चोपडा विद्यालय, गोदावरी हिंदी विद्यालय, फत्तेचंद जैन स्कूल, मनोरमा विद्यालय, माटे स्कूल, एसपीएम स्कूल, ज्ञानदीप विद्यालय, प्रेरणा विद्यालय, ज्ञानप्रबोधिनी स्कूल, जयवंत माध्यमिक विद्यालय, गीता मंदिर, सरस्वती विद्या मंदिर, जोग प्रशाला, डीवाय पाटील स्कूल, रामकृष्ण मोरे महाविद्यालय, एएसएम इन्स्टिट्यूट आदी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक व शिक्षक सहभागी होणार आहेत.

Web Title: #SaathChal Good response