#SaathChal ‘साथ चल’मध्ये डॉक्‍टरांचाही सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

भोसरी - आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्सतर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रमात शहरातील डॉक्‍टर्सही सहभागी होणार आहेत. भोसरी- मोशी प्राधिकरणातील नियोजित मध्यवर्ती सुविधा केंद्राच्या सर्कल परिसरात डॉक्‍टर्स दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनप्रसंगी डॉक्‍टरांनी आई-वडिलांच्या संगोपनाची शपथ घेतली. 

‘नॅशनल इंटिग्रेटेट मेडिकल असोसिएशन’ (निमा), ‘इंडियन डेन्टल असोसिएशन पिंपरी-चिंचवड शाखा’, ‘पिंपरी-चिंचवड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन’, ‘फॅमिली फिजिशियन असोसिएशन’ आदी संघटनांच्या सदस्य डॉक्‍टरांनी रविवारी (ता. १) त्याबाबत शपथ घेतली.या वेळी डॉ. गिरीश निकम, डॉ. गौतम जुगल, डॉ. निरज आडकर, डॉ. समीर देशमुख, डॉ. नीलेश पाटील, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. गणेश भोईर, डॉ. सत्यजित पाटील, डॉ. संतोष भांडवलकर, डॉ. सी. बी. पवार, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. पी. पी. गुप्ते, डॉ. सुजाता बावस्कर, डॉ. मनीषा गरूड, जबीन पठाण, डॉ. अभय तांबिले, डॉ. रमेश केदार आदींसह पिंपरी- चिंचवड, पुणे, हडपसर, कोंढवा, चाकण, तळेगाव, येरवडा, खराडी, हिंजवडी आदी भागांतील डॉक्‍टर उपस्थित होते.

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Palkhi Doctors participation