#SaathChal वारीमध्ये सहभागी होण्याची शपथ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे - आई-वडिलांना उत्तम स्वास्थ्य लाभावे, या उद्देशानेच वारीमध्ये दोन पावले चालायला हवेच. तसेच त्यांच्या विषयीची कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा उत्स्फूर्तपणे बोलून दाखविली. एवढेच काय ! तर ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी होण्याची शपथही घेतली. 

‘सकाळ’ कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत पुण्यातील विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजाभाऊ टिकार (तांबडी जोगेश्‍वरी), विवेक खटावकर, नितीन पंडित (तुळशीबाग गणपती), रवींद्र माळवदकर (राष्ट्रीय साखळीपीर तालीम) दत्ता परदेशी, विनोद व्हावळ (लाकडी गणपती मंडळ), शिरीष मोहिते, सदाशिव कुंदेन (सेवा मित्र), अनिल मोहिते (संयुक्त प्रसाद), प्रमोद कोंढरे (नातूबाग), रवींद्र रणधीर (जिलब्या मारुती), पुष्कर तुळजापूरकर (नेहरू तरुण), प्रीतेश केदारी, मंगेश डाळिंबकर (नागनाथपार), पुरुषोत्तम नांगरे, उल्हास खाटपे, प्रशांत मते (चिंचेची तालीम), अरुण गवळे (छत्रपती राजाराम मंडळ) अमित झांजले (नगरकर तालीम), उदय जगताप (आदर्श मित्र), कुमार रेणुसे (नवा विष्णू चौक मित्र मंडळ), धनंजय डिंबळे (कडबे आळी तालीम), नितीन जरांडे (चिमण्या गणपती), उमेश सपकाळ (काळभैरवनाथ तरुण मंडळ) आदींनी बैठकीत आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करण्याचा मानस व्यक्त करीत, ‘साथ चले’ या उपक्रमास पाठिंबा दर्शविला. ‘सकाळ’ने चांगला विचार तरुण पिढीपुढे मांडला आहे. या निमित्ताने तरुणांमध्ये सुद्धा संस्काराचे बाळगडू देण्याची संधी मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. 

कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या सूचना 
 पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे 
 शाळा, महाविद्यालयासही सहभागी होण्याचे आवाहन 
 वृद्धाश्रमांतील वृद्धांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे 
 आई-वडिलांचे संगोपन करण्यासाठीच कटिबद्ध होणार  
 सोशल मीडियाद्वारेही ‘साथ चल’ उपक्रमाचा प्रसार, प्रचार करणार.

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Palkhi Ganesh mandal