#SaathChal जैन बांधवांचाही संकल्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पिंपरी - आपल्या जन्मदात्यांचा सांभाळ करण्याचे वचन देण्यासाठी ‘दैनिक सकाळ’तर्फे आषाढीवारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ या अनोख्या उपक्रमात शहरातील जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

श्‍वेतांबर मूर्तिपूजक संघ आणि वर्धमान स्थानकवासी श्रावकसंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्संग सोहळ्यात त्यांना माहिती देण्यात आली. या वेळी राष्ट्रसंत ललितप्रभजी आणि चंद्रप्रभजी उपस्थित होते. ‘सकाळ’च्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या वेळी दिलीप नहार, आर. डी. ओसवाल, दिलीप सोनीगरा, सुरेश गदिया, राजेंद्र जैन, हेमंत गुगळे, अजित लुणिया, मनोज बाफना उपस्थित होते. 

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून  आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आळंदीतून निघणार  आहे. त्यामध्ये ‘साथ चल’ दिंडी सहभागी होणार आहे.यामध्ये आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करण्याची शपथ देण्यात येणार आहे.  जैन बांधवांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून ते यामध्ये सहभागी होणार आहेत.

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Palkhi Jain community