#SaathChal ।। बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ।।

शंकर टेमघरे
रविवार, 1 जुलै 2018

यंदाच्या आषाढी वारीत ‘साथ चल’ हा उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतला आहे. ‘वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या संगोपनाची’ हा संदेश यातून देण्यात येणार आहे. पंढरपुरात भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत असल्याने त्याने प्रत्यक्ष विठ्ठलाला अठ्ठावीस युगे विटेवर उभा ठेवला आहे. याच पुंडलिकाचा आदर्श घेऊन विठ्ठल-रुक्‍मिणी समजून आई-वडिलांची सेवा करू. त्यांच्यात कधी अंतर पडू देणार नाही, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.  

यंदाच्या आषाढी वारीत ‘साथ चल’ हा उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतला आहे. ‘वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या संगोपनाची’ हा संदेश यातून देण्यात येणार आहे. पंढरपुरात भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत असल्याने त्याने प्रत्यक्ष विठ्ठलाला अठ्ठावीस युगे विटेवर उभा ठेवला आहे. याच पुंडलिकाचा आदर्श घेऊन विठ्ठल-रुक्‍मिणी समजून आई-वडिलांची सेवा करू. त्यांच्यात कधी अंतर पडू देणार नाही, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.  

सध्याच्या काळात मुलांना संस्कारच राहिलेले नाहीत, हे वाक्‍य खूपदा आपण ऐकतो; पण त्याचे मूळ कारण शोधण्याचा विचार कोणी करीत नाही. त्याचे उत्तर खरे तर आपल्यातच असते. पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंबपद्धती होती. आई-वडील, आजी-आजोबा, चुलता-चुलती, मोठे बंधू यांच्याकडून दैनंदिन जीवनात घरात आपोआपच संस्कार घडत होते. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी ही नव्या पिढीसाठी तशी संस्काराची चालती-बोलती विद्यापीठेच होती. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात समाजव्यवस्था खूप वेगाने बदलत चालली आहे. ग्रामीण भागाचा काही प्रमाणात अपवाद वगळल्यास एकत्र कुटुंबपद्धती जवळपास लयाला गेली आहे, हे कटुसत्य आपल्याला स्वीकारावेच लागेल. जो तो विभक्त होऊ लागला आहे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या लोभापायी नाती स्वार्थी बनू लागली आहेत. भावा-भावांत, वडील-मुलांत मालमत्ता, पैसा यांसारख्या कारणांनी अंतर पडू लागले.

स्वाभाविकच घरातील एकोपा संपत चालला आहे. बिघडत चाललेले समाजस्वास्थ चांगले राहावे, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला. त्यासाठी यंदाच्या आषाढी वारीत ‘साथ चल’ हा उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतला. ‘वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या संगोपनाची’ हा संदेश यातून देण्यात येणार आहे. पंढरपुरात भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करीत असल्याने त्याने प्रत्यक्ष विठ्ठलाला अठ्ठावीस युगे विटेवर उभा ठेवला आहे. याच पुंडलिकाचा आदर्श घेऊन विठ्ठल-रुक्‍मिणी समजून आई-वडिलांची सेवा करू. त्यांच्यात कधी अंतर पडू देणार नाही, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.  

‘सकाळ’ आणि ‘साथ चल’
पंढरीची वारी वर्षानुवर्षे सुरू आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत लाखो भाविक संतांच्या संगतीने आत्मिक सुखाचा आनंद घेतात. तब्बल दोन ते तीन लाख वारकऱ्यांचे वारीचे एक कुटुंबच अठरा दिवस गुण्या-गोविंदाने नांदते. ही वैष्णवांची मांदियाळी पंढरीत पोचताच वारकरी चंद्रभागेत स्नान करतात. भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात, विठ्ठल दर्शनाला जातात. अडीचशे किलोमीटर पायी वाटचाल करणारे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात. तो आदर्श घेऊन प्रत्येकाने आधी घरातील आपल्या विठ्ठल-रुक्‍मिणी स्वरूप आई-वडिलांना प्रेम द्यावे, त्यांची मनोभावे सेवा करावी, त्यांना उतारवयात काही दुःख होईल असे वागू नये, हा संदेश सध्याच्या तरुण पिढीपर्यंत पोचविणे हा ‘सकाळ’चा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या साक्षीने ‘सकाळ’च्या या दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आई-वडिलांना सांभाळण्याची शपथ देण्यात येणार आहे. या उपक्रमाची वेगवेगळ्या टप्प्यात विभागणी केली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या शेवटी ही प्रबोधनाची दिंडी सहभागी होईल. या प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांसाठी वारीत चालायचे आहे. यात प्रत्येक टप्पा दीड ते दोन किलोमीटर असणार आहे. सहा जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवडनगरीत आगमन होत आहे. या उपक्रमाला भक्ती-शक्ती चौकातून प्रारंभ होईल.

भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डी गावठाणातील विठ्ठल मंदिरापर्यंत पहिला टप्पा असेल. त्यानंतर सात जुलै रोजी सकाळी संत तुकाराम पालखी सोहळ्याच्या मागे आकुर्डीतून निघून खंडोबा मंदिर, चिंचवड स्टेशन, एचए कंपनी, नाशिक फाटा, फुगेवाडी अशी या दिंडीची वाटचाल असेल. पुणे मुक्काम करून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना नऊ जुलै रोजी सकाळी पूलगेट ते हडपसर अशी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘सकाळ’ची दिंडी सहभागी होईल.

त्यात तीन टप्पे असणार आहे. भैरोबा नाला, लोहिया गार्डन, गाडीतळ हडपसर यांचा त्यात समावेश असेल. या ठिकाणांवर विश्‍वकल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे पसायदान, तसेच आई-वडिलांच्या संगोपनाची शपथ देण्यात येईल. यात कोणीही कोणतीही घोषणाबाजी करणार नाही. संतांच्या पालख्यांमध्ये पायी चालून आई-वडिलांच्या संगोपनाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी हा उपक्रम होत आहे.

कुळी कन्या पुत्र होतीजे सात्त्विक । तयाचा हरिक वाटे देवा।।
संतांनी हीच शिकवण दिली आहे. कुटुंबात सात्त्विकता असेल, त्याचाच देवाला हेवा वाटतो. अन्यथा अन्य सर्व कर्म शून्य आहेत. 

फिनोलेक्‍स कंपनीने ‘साथ चल’ या उपक्रमात मुख्य सहभाग घेतला आहे. तसेच संत तुकाराम महाराज संस्थान आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानचा या उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Palkhi Timetable 2018