#SaathChal पूजासाहित्य दुकानांनी देहूनगरी सजली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

देहू - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त देहू परिसर विविध वस्तू; तसेच प्रसादाच्या दुकानांनी सजला आहे. तुळशीच्या माळा, अष्टगंध, अबीर, बुक्का, प्रसाद आणि गाथा असे अनेक प्रकारचे पूजासाहित्य उपलब्ध झाले आहे; तर संत तुकाराम महाराज संस्थानने पाच हजार गाथा विक्रीसाठी ठेवल्या आहेत. 

पंढरपूर, आळंदीतील व्यापाऱ्यांनीही देहूत दुकाने थाटली आहेत. आषाढी वारी म्हटले की कपाळाला बुक्का, अष्टगंध, गळ्यात

तुळशीच्या माळा आणि हातात टाळ आणि खांद्यावर पताका अशा वेशभूषेतील वारकरी डोळ्यासमोर येतो. वारकऱ्यांसह अन्य नागरिकांनाही या साहित्याचे आकर्षण असते. त्यामुळे या काळात कुंकू, बुक्का, तुळशीच्या माळा अशा वस्तूंची हमखास खरेदी होते. हातात टाळ असेल, तर सदैव भगवंताचे नामस्मरण सुरू राहते. हे सर्व लक्षात घेऊन देहूमध्ये लहान मोठ्या आकारातील टाळ, चिपळ्या दाखल झाल्या आहेत. 

याबाबत व्यापारी शुभांगी मोरे म्हणाल्या, की इतर तीर्थक्षेत्रापेक्षा देहूमध्ये पूजेचे साहित्य स्वस्त दरात उपलब्ध होते. त्यामुळे वारीतील वारकरी देहूतून आवर्जून खरेदी करतात. या काळात विविध धार्मिक पुस्तकांचीही मोठी विक्री होते. 

दिंडीप्रमुखांकडून खरेदी
यंदा पालखी सोहळ्यात ३३० दिंड्या सहभागी होणार आहेत. त्यात काही देहू आणि परिसरातीलही आहेत. वारीत कोणत्याही वस्तूंची कमतरता जाणवू नये, यासाठी दिंडीतील प्रमुख मोठ्या प्रमाणावर विविध साहित्यांची खरेदी करतात. 

कही खुशी कही गम
 यंदा जिल्हा पोलिस अधीक्षकाच्या सांगण्यावरून देहूतील रस्त्यावर असलेली १५० अतिक्रमणे हटविली. त्यात प्रसाद, चहाच्या टपऱ्यांचा समावेश होता. अनेकांनी वारीत विक्रीसाठी साहित्य आणले होते. मात्र दुकान उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांत नाराजी आहे; तर कायमस्वरूपी दुकान असलेल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संत तुकाराम महाराज संस्थानने भाविकांसाठी स्वस्त दरात गाथा उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदा पाच हजार गाथा नव्याने छापल्या आहेत.
- सुनील महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख

Web Title: #SaathChal Pandharichi Wari sant tukaram maharaj palkhi dehu